शेतकऱ्यांचे वीज वितरण कार्यालयाबाहेर शेकोटी पेटवून आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महावितरण कंपनीच्या वतीने औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करणे सुरू आहे. महावितरण कंपनीच्या या मोहिमेच्या विरोधात गंगापूर तालुक्यातील महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर भर दिवसा शेकोटी आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलक खूपच आक्रमक झाल्याचं पहायला मिळाल आहे.

महावितरणच्या कार्यालयासमोर लाकडे जाळून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी तातडीने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापणे बंद करा आणि शेतकऱ्यांना पूर्णवेळ विजेचा पुरवठा करा अशी मागणी केली. सध्या गहू, हरभरा या पिकाचे दिवस आहेत. या पिकाला पाणी द्यायचे तर महावितरणने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकाला पाणी देण्यास अडचण होत आहे. त्यामुळे शेतकरी संतापले आहेत. आणि आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!