शेतकऱ्यांनो काळजी घ्या ! पुढील ३ दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : खरिपाच्या हंगामात जोरदार झालेल्या पावसाच्या नुकसानीतून अद्यापही राज्यातला शेतकरी सावरला नसताना आता पुन्हा एकदा राज्यात पाऊस जोरदार हजेरी लावणार असल्याची महत्वाची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. राज्यातील मुंबई, पालघर, ठाणे, पुणे घाट परिसर, कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात आज सकाळपासूनच ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. येत्या काही तासात संबंधित जिल्हा मध्ये मुसळधार पाऊस हजेरी लावणार अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

कमी दाबाच्या क्षेत्रामुळे अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली आहे कोकण मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण झाले असून तुरळक ठिकाणी हलक्‍या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आ. हे शनिवारी दिनांक सहा सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये मध्य महाराष्ट्रातील नाशिक येथे 30 मिलिमीटर, आजरा वीस मिलिमीटर त्र्यंबकेश्वर दहा मिलिमीटर तर कोकणातील हरणे इथं 20 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.राज्याच्या कमाल व किमान तापमानात वाढ झाली आहे. शनिवारी दिनांक 5 रोजी गडचिरोली येथे नीचांकी 16.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर सांताक्रूझ येथे उच्चांकी कमाल 37 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

पुढील तीन दिवस जोरदार पाऊस

सध्या लक्षदीप आणि दक्षिण-पूर्व आरबी समुद्रात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे तसाच लक्षद्वीप आणि कर्नाटक किनारपट्टी परिसरात द्रोणी स्थिती निर्माण झाली आहे याचा एकत्रित परिणाम म्हणून महाराष्ट्रात पावसाची स्थिती निर्माण झाली आहे पुढील तीन दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

आज या भागात पाऊस

आज सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. पुढील काही तासांत याठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे.

शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी

सध्या कोकण विभागात भाताची कापणी सुरु आहे. मात्र तळकोकणात मागील दोन दिवसात पाऊस झाल्याने भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कोकण तसेच राज्यातल्या इतर भागातल्या शेतकऱ्यांनी काढणी केलेला शेतमाल सुरक्षित ठेवावा. ठगाळ वातावरणाचा मोठा फटका तुरीच्या पिकाला बसण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!