शेतकऱ्यांनो सतर्क रहा : राज्यतल्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये गारपिटीसह पावसाची शक्यता…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय हवामान खात्याने राज्यातलया काही भागात आज(२८) आणि उद्या (२९) गारपिटीसह पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. राज्यातल्या विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मंगळवारी विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे.

देशात गारपिटीसह पावसाची शक्यता
हवामान तज्ञ के .एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार उप-हिमालयीन प.बंगाल-सिक्किम; पू.मध्यप्रदेश-विदर्भ-छत्तीसगड;प.मध्यप्रदेश-बिहार-झारखंड;तुरळक ठिकाणी गडगडाटासह पाउस व गारपीटची शक्यता आहे. येत्या 2 दिवसांनंतर मध्य व पूर्व भारतात 2-4°C पर्यंत घसरण होण्याची शक्यता.भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

राज्यातल्या या जिल्ह्यांना अलर्ट

आज दिनांक 28 रोजी औरंगाबाद, जालना आणि गोंदिया, या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे तर अमरावती वर्धा, नागपूर,भंडारा या भागाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.  तर दिनांक 29 डिसेंबर रोजी चंद्रपूरला यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर नागपूर, गोंदिया आणि भंडारा या भागाला ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.राज्यातील इतर म्हणजे मध्य महाराष्ट्रातल्या नाशिक, नगर, पुणे ,सातारा, सांगली ,कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये ढगाळ किंवा पावसाळी वातावरण फक्त मंगळवारी 28 डिसेंबर एकच दिवस असू शकते. असे देखील हवामान खात्याने सांगितले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!