मोदींनी पैसे पाठवले समजून शेतकऱ्याने बांधले घर, आता शेतकरी अडचणीत ; नक्की काय आहे प्रकरण ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : औरंगाबाद जिल्हा परिषद पंचायत विभागाच्या भोंगळ कारभाराचा नमुना चव्हाट्यावर आला आहे. बँक अकाऊंटच्या केवळ एका नंबरच्या चुकीने पैठण तालुक्यातील पिंपळवाडी येथील ग्रामपंचायतीचे १५ लाख रुपयाचा निधी दावरवाडी येथील एका शेतकऱ्याच्या बँक ऑफ बडौदाच्या खात्यात जमा झाले आहेत.

सदरील शेतकऱ्यांनी हे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जमा केल्याचे समजून या पैशातून सुसज्ज घर बांधकाम केले. मात्र बँकेने वसूली काढल्यानंतर हा घोटाळा उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे. पंतप्रधान मोदींनी २०१४ च्या निवडणुकांमध्ये दिलेले आश्वासन पाळत हे पैसे त्याच्या जनधन खात्यात टाकले. असे समजून यातील ९ लाख काढत त्याने त्याचे घरही बांधले.

ग्रामपंचायतीच्या तब्बल ४ महिन्यांनंतर ही चूक लक्षात आली असून आता पिंपळवाडी ग्रामपंचायतीने पैसे परत करण्यासाठी शेतकऱ्याकडे तगादा लावला आहे. पैठण तालुक्यातील दावरवाडी येथील शेतकरी ज्ञानेश्वर जनार्धन औटे यांच्या बँक ऑफ बडाेदाच्या खात्यावर १७ ऑगस्ट २०२१ ला १५ लाख ३४ हजार ६२४ रुपए जमा झाले. खात्यात इतके पैसे कसे आले यावर गावात चर्चा सुरु झाल्यानंतर अनेकांनी ज्ञानेश्वर यांचे अभिनंदन करत, हे पैसे दिलेल्या आश्वासनानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच पाठवले असल्याचे त्यांना सांगितले.

खरंच असं घडले असेल हा विचार करत ज्ञानेश्वर यांनी दावरवाडी येथे घर बांधायला घेतले व जमा रकमेतील ९ लाख खर्च केले. मात्र सदरील निधी १५ व्या वित्त आयोगाचे ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदेकडून मिळणारे हे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाल्याची चूक ४ महिन्यांनंतर ग्रामपंचायतीला लक्षात आली. आता ज्ञानेश्वर यांना ग्रामपंचायतीने पैसे परत करण्याचे पत्र पाठवले असून यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!