SBI मध्ये खाते असणाऱ्या शेतकऱ्यांना आता घरबसल्या मिळणार ‘या’ सुविधा; जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । सध्या देशात शेतकरी कृषी नव्या कायद्यांच्या विरोधात निषेधार्थ आंदोलन करत आहेत. बराचसा शेतकरी वर्ग हा आंदोलनात सक्रीय आहे. या पार्श्वभूमीवर एसबीआय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडियाने शेतकरी ग्राहकांसाठी काही सुविधा या घरपोच देण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी देखील सुरु केली आहे. त्यामुळे तुम्ही जर शेतकरी आहात आणि तुमचे एसबीआय मध्ये खाते आहे तर तुम्हाला या सुविधांचा फायदा होवू शकणार आहे. या सुविधांमध्ये विशेषतः ज्या अवित्तीय म्हणजे नॉन फायनान्शिअल सुविधा आहेत यांचा समावेश आहे. ज्यामध्ये चेक, डिमांड ड्राफ्ट, पे ऑर्डर ई. घ्यायला येणे, अकाऊंट स्टेटमेंट ची विनंती घेणे, टर्म डिपॉझीटची पावती ई. गोष्टींचाही समावेश आहे. या संदर्भातील माहिती एसबीआय णे त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरून दिली आहे.

या सुविधांचे वैशिष्ट्य म्हणजे ग्राहक घरबसल्या रोख उचल, रक्कम हस्तांतरण, चेक मिळविणे, घरी चेकची मागणी करणे, जीवन प्रमाणपत्र घ्यायला येणे, केवायसी कागदपत्रे घ्यायला येणे तसेच ड्राफ्ट ची डिलिव्हरी अशा गोष्टी या सुविधांच्या माध्यमातून होणार आहेत. पण या सुविधांचा लाभ हा काही अटींसहित घ्यावा लागणार आहे. म्हणजे तुम्हाला पैसे काढायचे असतील तर तुमचे त्याची किमान मर्यादा १ हजार रु आणि कमाल मर्यादा २०००० रु आहे. तुमच्या खात्यात तेवढी रक्कम असणेदेखील बंधनकारक आहे. तसे नसेल तर तुमची विनंती नाकारली जावू शकते.

या सुविधेचा लाभ जॉईट अकाऊंट असणाऱ्या तसेच मायनर अकाऊंट आणि नॉन-पर्सनल नेचर अकाऊंट असणाऱ्यांना घेता येणार नाही आहे. तुम्ही तुमच्या मोबाईल अप्लिकेशन वरून या सुविधांसाठी नोंदणी करू शकता. तसेच १८००११११०३ या क्रमांकावर सकाळी ९ ते सायंकाळी ४ दरम्यान कॉल करू शकता. https://bank.sbi/dsb या संकेतस्थळावरही भेट देवू शकता. वयस्कर तसेच दृष्टीबाधित, अपंग लोकांना याचा लाभ होणार आहे. बँकेतील कर्मचारी घरी येवून तुमची कामे करून देणार आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!