शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित ; सोयाबीनचा दर 7 हजारांवर, पहा कोणत्या बाजार समितीत किती भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील दोन तीन दिवसांपासून राज्यभरात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाचा रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे. तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देखील याचा फटका बसला असून कांदे खराब होण्याच्या अवस्थेत आहेत. अशा वेळी सोयाबीनची काय स्थिती आहे याबाबत शेतकऱ्यांना उत्सुकता आहे. शेतकऱ्यांना सोयाबीनला चांगला भाव मिळावा अशी आशा आहे. त्याप्रमाणे चित्र बदलताना सध्याच्या बाजारभावाकडे पाहून वाटते आहे. आज दिनांक 4 डिसेम्बर रोजी वाशीम,मूर्तिजापूर आणि अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोआयबीनला 7 हजारहून अधिक कमाल भाव मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

या बाजार समितीत चांगला दर
मुर्तीजापुर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनचा आज किमान भाव 6050 कमाल सात हजार 190 तर सर्वसाधारण भाव सहा हजार 450 इतका मिळाला. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किमान पाच हजार पाचशे, कमाल 7100 तर सर्वसाधारण सहा हजार पाचशे इतका दर मिळाला आहे. तर सर्वाधिक अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती इथं किमान 5400 कमाल 7425 तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पन्नास इतका राहिला.

आजचे सोयाबीन बाजारभाव प्रति क्विंटल (किमान -कमाल -सर्वसाधारण )

औरंगाबाद —5900–6200–6050
तुळजापूर —6700–6700–6700
राहता —6400–6771–6651
नागपूर —4800–6551–6113
मेहकर —5500–6900–6500
जालना —-6100–6700–6550
अकोला —5400–7425–6350
परभणी —6100–6450–6250
वाशीम —5500–7100–6500
पैठण पिवळा—5900– 5900–5900
भोकरदन —6400–6500–6450
भोकर —5800–6589–6195
हिंगोली- खानेगाव नाका—6000–6500–6250
मुर्तीजापूर —6050–7190–6450
मलकापूर —5000–6666–5700
गंगाखेड —6600–6850–6650
तेल्हारा —6000–6500–6250
धरणगाव —4795–6500–6015
मुखेड —6100–6700–6600
पांढरकवडा —6100– 6400–6250
सिंदी —5200– 6500–6200
सिंदी(सेलू) —5650– 6675–6350

Leave a Comment

error: Content is protected !!