अमरावतीत शेतकऱ्यांचा, महावितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी, येथे, विद्युत महावितरण कंपनी मर्यादित, कार्यालयावर, तालुक्यातील हजारो, शेतकऱ्यांनी जमाव केला होता, तालुक्यातील शेतकरी, आकाशसमित संकटाने, कंटाळलेला आहे, निसर्गाच्या अवकृपेने शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले पीक, नेस्तनाबूत झाले असताना अशातच विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी, बागाईत ओलीता खाली येणाऱ्या, शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला होता.

हवालदिल झालेल्या शेतकरी वेळेवर विद्युत बिल भरणा करू शकत नसल्याने तालुक्यात शेतकऱ्यांचे चिंता वाढलेली आहे. गहू केळी संत्रा पपई, हळद पान पिंपरी, चना व भाजीपाला, यावेळी शेतकऱ्यांनी शेतात पेरलेला आहे. शेतकऱ्यांनी वीज बिल न भरल्याने, त्यांचे विद्युत पुरवठा खंडित केल्याने शेतकऱ्यावर शासनाने तलवारी प्रमाणे घाव, केल्या सारखे वाटत असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. तालुक्यातील शेतकरी आज सकाळी अंजनगाव येथील कार्यालयात धडकले होते. जमावाची समजूत घालुन ठाणेदार दिपक वानखडे, यांनी जखमेवर फुंकर घातली सारखे दिसुन आले, विद्युत वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता गुजर यांनी, आंदोलकांचे नेते दिलीप भोपळे व शेतकऱ्यांशी चर्चा करून, त्यांना पाच हजार भरण्याचा सल्ला दिला.

त्यामुळे हा शेतकरी जमाव शांत होऊन, इलेक्ट्रिक खंडित केलेल्या पुरवठा, पूर्ववत चालू करावा अशी मागणी करत घोषणाबाजी करत होता, तालुक्यातील शेतकरी नीलेश देशमुख, दिलीप भोपळे, ताते, व सर्व ग्रामीण भागातील शेतकरी उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!