शेतकऱ्यांच्या उत्पन्नात होईल वाढ, जाणून घ्या ! फलोत्पादन पिकांसाठी शासनाचा ‘मॅग्नेट’ प्रकल्प

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील कृषी हवामान विभाग निहाय फळ विपणन आणि निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी एक मूल्य साखळ्यांमध्ये खासगी गुंतवणुकीला प्राधान्य देण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी राज्य शासनाने आशियाई विकास बँकेच्या आर्थिक सहकार्याने महाराष्ट्र ऍग्री बिझनेस नेटवर्क म्हणजे मॅग्नेट प्रकल्प राबवण्यात येत आहे.

कोल्हापूर विभागातील केळी, डाळिंब, स्ट्रॉबेरी, भेंडी व मिरची आणि फुल पीक या पिकांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. पहिल्या टप्प्यात 25 शेतकरी उत्पादक कंपन्या आणि पाच मूल्य साखळी गुंतवणूकदारांची निवड केली जाणार आहे. या प्रकल्पाचा कालावधी सहा वर्षांचा असून 142.9 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स रकमेचा आहे. यातून फळपिकांचे उत्पादन उत्पादकता व गुणवत्ता वाढवणे, काढणीपश्‍चात होणारे नुकसान कमी करणे व शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वाढ करणे आदी उद्दिष्ट आहेत. मॅग्नेट प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन पिकांच्या काढणीनंतर नुकसान कमी करण्यास तसेच साठवणूक क्षमता वाढवण्यास मदत होणार आहे.

या योजनेसाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत 28 जून पर्यंत असणार आहे. यासाठीच्या अर्जाचा नमुना www.msamb.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. हे अर्ज ऑनलाइन आणि प्रत्यक्ष स्वरूपात दाखल करता येतील.

राज्यातील डाळिंब, केळी, संत्रा, मोसंबी, सीताफळ, पेरू, चिकू, स्ट्रॉबेरी, भेंडी, मिरची इत्यादी फलोत्पादन पिकांसाठी उत्पादक ते ग्राहक अशी एकात्मिक मूल्य शाखांचा विकासासाठी या प्रकल्पाची आखणी केली आहे. यात सध्या अस्तित्वात असलेल्या नव्याने निर्माण होणाऱ्या शेतकरी, उत्पादक संस्था, निर्यातदार, प्रक्रियादार, संघटित, किरकोळ विक्रेते, कृषी व्यवसाय करणारे लघु व मध्यम उद्योजक, वित्तीय संस्था, स्वयंसहाय्यता समूह, यांचा सहभाग घेण्यात येईल.

निधी

— या प्रकल्पाचा कालावधी सहा वर्षाचा असून 2026-27 पर्यंत राबविण्यात येणार आहे.

–हा प्रकल्प 142.9 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतका रकमेचा असून त्यापैकी 70 टक्के निधी म्हणजे शंभर दशलक्ष अमेरिकन डॉलर्स आशियाई
विकास बँकेकडून कर्ज स्वरूपात व 30 टक्के निधी म्हणजे 42 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स राज्य शासनाचा स्वनिधी असणार आहे.

अर्थसाहाय्य

प्रकल्पाचे उद्देश साध्य करण्यासाठी प्रस्तावित कृषिविषयक काढणीपश्‍चात हाताळणी व व्यवस्थापन मूल्य वृद्धि प्राथमिक किंवा दुय्यम प्रक्रिया विपणन आदी विविध बाबींसंदर्भात शेतकरी उत्पादक संस्था व मूल्य साखळी गुंतवणूकदार या लाभार्थ्यांच्या उपयोग प्रकल्पांना Matching Grant या उपघटकाच्या अंतर्गत जास्तीत जास्त 60 टक्‍क्‍यांपर्यंत अर्थसहाय्य देय राहणार आहे. तसेच इच्छुक प्रकल्पांना Financial Intermediation Loan (FIL) याउपघटका अंतर्गत विभागीय वित्तीय संस्थांद्वारे खेळते भांडवल व मध्यम मुदत कर्ज कमी व्याज दरात उपलब्ध करून देण्यात येईल. यातून प्रकल्पाअंतर्गत उत्पादक आणि उद्योजकांना नवीन व संघटित बाजारपेठ इथं प्रवेश मिळवणे सोपे होईल.

फायदे
— या प्रकल्पातील विविध घटकांच्या अंमलबजावणीमुळे लाभार्थी शेतकरी कुटुंबाच्या वार्षिक निव्वळ उत्पन्नामध्ये वाढ होण्यास मदत होईल.
–प्रकल्पामध्ये सहभागी शेतकरी उत्पादक संस्थांच्या फलोत्पादन पिकांच्या काढणीपश्‍चात नुकसान कमी होईल.
— लोकांना थेट रोजगार किंवा स्वयंरोजगार संधी उपलब्ध होतील.
— पिकांची गुणवत्ता व अन्न सुरक्षितता मानांकनाचे अवलंबामूळ लाभार्थी शेतकऱ्यांना वाढीव किंमत मिळू शकेल.
— मूल्य साखळीतील उत्पादन ते वितरण व्यवस्थेमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यावर विशेष भर दिला जाईल.
— या प्रकल्पामुळे उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादक पीक संरक्षण काढणीपश्‍चात हाताळणी बाजारपेठ इत्यादी विषय सेवा उपलब्ध होतील.
— बाजाराभिमुख व्यवसाय विकास कार्यक्रम कार्यक्षमपणे राबवून लघु व मध्यम व्यवसायिकांची क्षमता बांधणी होईल.

Leave a Comment

error: Content is protected !!