Farmers Loan : शेतकऱ्यांना मिळणार 10 मिनिटात कर्ज; पहा, काय आहे संपूर्ण प्रक्रिया!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : अलीकडे सर्वच शेतकऱ्यांची ओरड असते की बँका शेतकऱ्यांना लवकर कर्ज (Farmers Loan) उपलब्ध करून देत नाहीत. त्या शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. ज्यामुळे त्यांना शेतीसाठी भांडवल उभारताना मोठी अडचण येते. मात्र, आता केंद्र सरकारने शेतकऱ्यांची हीच अडचण लक्षात घेऊन, त्यांना अधिक सुलभतेने आणि तात्काळ कर्ज उपलब्ध व्हावे. यासाठी एक अनोखा प्रयोग हाती घेतला आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना केवळ 10 मिनिटात शेतीसाठी दीड लाखापर्यंतचे कर्ज उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे हे कर्ज मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना (Farmers Loan) काहीही गहाण ठेवण्याची गरज नाही. चला तर मग पाहूया नेमका काय आहे सरकारचा हा प्रयोग…

‘मे’ महिन्यापासून देशभर राबविणार (Farmers Loan Agri Stack Project)

केंद्र सरकारकडून येत्या मे महिन्यापासून हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबविला जाणार आहे. त्यासाठी देशातून महाराष्ट्रातील बीड आणि उत्तर प्रदेशातील फारुखाबाद या दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. यासाठी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये प्रशासनाकडून सध्या युद्ध पातळीवर काम सुरु आहे. प्रामुख्याने राज्यातील बीड जिल्ह्यात राज्य सरकारच्या ई-पीक पाहणी आणि जमिनीच्या नोंदींचा आधार घेऊन, जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनींचे 7/12 उतारे आधार कार्डसोबत जोडले जात आहे. यातील सुमारे 65 टक्के काम पूर्ण झाले आहे. असे शासकीय पातळीवरून सांगितले जात आहे. त्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांना चुटकी सरशी कर्ज मिळण्यास मदत होणार आहे.

‘अ‍ॅग्री स्टॅक’ अँप विकसित

आता 10 मिनिटात शेतकऱ्यांना कर्ज (Farmers Loan) मिळवायचे म्हणजे तितके फास्ट डिजिटलायझेशन महत्वाचे आहे. हीच बाब लक्षात घेऊन, शेतकऱ्यांना कर्ज देण्याची ही संपूर्ण प्रक्रिया राबविण्यासाठी केंद्र सरकारकडून ‘अ‍ॅग्री स्टॅक’ हे अँप विकसित करण्यात आले आहे. हे अँप शेतकऱ्यांना कर्ज लागेल तेव्हा संबंधित बँक आणि शेतकरी यांना हे एका क्लिकवर शेतकऱ्यांची सर्व माहिती उपलब्ध करून देण्यास मदत करणार आहे. सध्याच्या घडीला सर्व शेतकरी ऑनलाईन पिकांची नोंदणी करतात. त्यासाठी आता केंद्र सरकारकडून देशभरात या एकाच ॲपमधून पिकांची नोंदणी देखील केली जाणार आहे.

हेही वाचा : शेतकऱ्यांना मिळतंय 4 टक्के व्याज दराने 3 लाखांपर्यंत कर्ज; वाचा.. संपूर्ण प्रक्रिया! (https://hellokrushi.com/farmers-loan-up-to-3-lakhs-4-percent-interest-rate/)

कशी असेल संपूर्ण प्रक्रिया?

ज्या शेतकऱ्यांना कर्ज हवे असेल. त्यांना हे केंद्र सरकारचे ‘अ‍ॅग्री स्टॅक’ अँप डाउनलोड करावे लागणार आहे. त्यात तुमचे नाव आणि आधार क्रमांक टाकून पडताळणी होईल. शेतकऱ्यांच्या चेहऱ्याची ओळख पटवली जाईल. त्यानंतर शेतकऱ्यांना या अँपमध्ये संबंधित बँकांच्या कर्जाच्या ऑफर्स दिसतील. ज्यातील आवश्यकतेनुसार एक ऑफर स्वीकारून, त्यावर किल्क केल्यानंतर 10 मिनिटात बँकेकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कर्जाची रक्कम जमा केली जाणार आहे. (अर्थात मोबाईलमध्ये बॅलन्स लोन घेतो. अगदी तशीच ही संपूर्ण प्रक्रिया असणार आहे). या संपूर्ण प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड आवश्यक असणार आहे. कारण, शेतकऱ्यांना हे काहीही गहाण न ठेवता मिळणारे कर्ज किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मिळणार आहे.

error: Content is protected !!