शेतकऱ्यांनो अजूनही जुन्या दरानेच खतांची खरेदी करताय ? थांबा..! जाणून घ्या कोणत्या कंपनीचा किती आहे दर ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून खतांची दरवाढ झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. यानंतर मात्र अनेक प्रतिक्रिया आल्या नंतर केंद्र सरकारनं खतांच्या अन्नद्रव्य आधारित अनुदान म्हणजे (एनबीएस) धोरणात केंद्र सरकारनं बदल करून शेतकऱ्यांसाठी रासायनिक खतांसाठी अनुदान जाहीर केले आहे. त्यामुळे राज्यात खतांच्या किमती घटल्या आहेत. मात्र राज्यातल्या काही भागात अद्यापही काही खत कंपन्यांना त्यासंदर्भात आदेश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये अद्यापही साठा उपल्सब्ध असून खत विक्रेते जुन्याच दराने खत विक्री करीत आहेत. नवीन कमी किमतीच्या खतासाठी शेतकऱ्यांना काही काळ थांबण्याचा सल्ला देखील दिला जातो आहे. मात्र ऐन खरीप हंगाम तोंडावर आला असताना शेतकऱ्यांना मात्र खतांची आवश्यकता आहे. आजच्या लेखात आपण खतांच्या किमतींबाबत जाणून घेऊया …

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 मे रोजी DAP म्हणजे (डाय अमोनिअम फॉस्फेट) या खताच्या एका गोणी वरचे अनुदान 500 रुपयांवरून 1200रुपयांपर्यंत वाढले. त्यामुळे सगळ्याच कंपन्यांची डीएपी खताची एक गोणी आता शेतकऱ्यांना 2400 रुपयांऐवजी 1200 रुपयांना मिळणार आहे.यानंतर 20 मे रोजी केंद्रीय खते मंत्रालयाने जारी केलेल्या नोटिफिकेशन नुसार फॉस्फेट आणि पोटॅश खतांसाठी देखील सबसिडी जाहीर करण्यात आली आहे.केंद्र सरकारकडून रासायनिक खतांवर एनबीएस म्हणजेच (न्यूट्रिएंट्स बेस्ड सबसिडी) या योजनेअंतर्गत अनुदान दिले जातात. म्हणजेच खतामधील पोषक द्रव्यांच्या आधारावर त्या खातात किती किलो नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश आणि सल्फर आहे यानुसार सबसिडी दिली जाते.

2020 -21 मध्ये नायट्रोजन साठी प्रतिकिलो 18.789 रुपये, फॉस्फेटसाठी प्रतिकिलो 14.888 रुपये, पोट्याशियमसाठी प्रति किलो10. 116 रुपये तर सल्फर साठी प्रति किलो 2. 374 रुपये अनुदान निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर मात्र 2021- 22 च्या खरीप हंगामासाठी नायट्रोजन साठी प्रतिकिलो 18.7 89 ,फॉस्फेटसाठी प्रति किलो 45. 32 रुपये पोटॅशियमसाठी प्रति किलो 10. 116 रुपये तर सल्फर साठी प्रति किलो दोन पॉईंट 374 रुपये अनुदान निश्‍चित करण्यात आले आहे.

खातांचे नवे दर

इफको या कंपनीच्या अधिकृत वेबसाईट वरून मिळालेल्या माहितीनुसार

DAP 18-46-00 –1200₹
NPK 10-26-26–1175₹
NPK 12-32-16–1185₹
NPS 20-20-0-13–975₹

तसेच कंपनीने असे देखील म्हटले आहे की बाजारात उपलब्ध असलेल्या MRP छापील बॅग सुधा नवीन दराने विकण्यात येतील. म्हणजे सध्या इफकोची एनपीके 10 -26- 26 ही बॅग 1775 रुपयांना उपलब्ध आहे. ती आता इथून पुढे 1175 रुपयांना विकली जाईल.

कोरोमंडल,

DAP 18-46-00–1200₹
NPS 20-20-0-13–1050₹
NPS 16-20-0-13–1050₹
NPK 14-35-14–1400₹
NPK 10-26-26–1300₹
NP 28-28-0-0–1450₹
NPS 24-24-0-8–1500₹
NPKS15-15-15-09–1150₹

सरदार

सरदार अमोनियम सल्फेट– 735₹
DAP –1200₹
NPK 10-26-26–1175₹
NPK 12-32-16–1185₹
ASP –975₹

महाधन

महाधन 24 24 00 1450₹
महाधन 10 26 26 1390₹
महाधन 12 32 16 1370₹
महाधन 20 20 0 13 1150₹
महाधन 14 28 00 12 80₹

येथे करा तक्रार

शेतकऱ्यांना खतांच्या किमती बाबतीत कोणतीही समस्या असल्यास कृषी आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षाकडून दखल घेतली जाईल. त्यासाठी शेतकऱ्यांना सकाळी दहा ते सायंकाळी सहा या दरम्यान तक्रार करता येईल. यासाठी क्रमांक आहे -8446117500.
याबरोबरच आयुक्तालयाने एक टोल फ्री क्रमांक देखील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे त्याचा क्रमांक आहे-18002334000

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!