पीकविमा प्रकरणी बीडमध्ये शेतकरी संघर्ष समिती आक्रमक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कोरोना महामारी , लॉकडाऊन , बदलते हवामान यामुळे शेतकरी वर्ग पुरता खचला आहे. अशातच मागील वर्षाचा पीकविमा अद्यापही न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. बीड जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना विम्याची रक्कम देण्यात यावी, या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली त्यानंतर नगर रोड मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कचेरीवर धडकला, दरम्यान या वेळी जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या प्रशासनासमोर मांडल्या आहेत.

2020 खरीप हंगामात जिल्ह्यातील 17 लाख शेतकऱ्यांनी 60 कोटी रुपये भरले, त्यामध्ये केवळ वीस हजार शेतकऱ्यांना 13 कोटी 46 लाख रुपयांची नुकसान भरपाई म्हणून विमा मिळाला आहे. चार लाख शेतकरी पात्र असताना देखील हा विमा या शेतकऱ्यांना का दिला नाही.? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला, यातील 698 कोटी पैकी 625 कोटीची रक्कम शासनाला परत गेली आहे. ही रक्कम पात्र शेतकऱ्यांना वाटप करण्यात यावी, अशी मागणी करत हा मोर्चा काढण्यात आला. संबंधित शेतकऱ्यांना विमा न मिळाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघर्ष समिती अध्यक्ष गंगा थावरे यांनी दिला आहे.

2020 मध्ये परतीच्या मुसळधार अतिवृष्टीने पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. सुमारे 4 लक्ष 32 हजार शेतकऱ्यांचे अतिवृष्टी ने नुकसान झाल्याचे अहवालात म्हटले आहे. प्रधानमंत्री पीक योजनेत जवळपास 17 लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेत मोठ्या प्रमाणात आपल्या पिकांचा पीकविमा भरला होता. नुकसानभरपाईपोटी फक्त 20 हजार शेतकऱ्यांनाच पीकविमा नुकसान भरपाई मिळाली. उर्वरित शेतकऱ्यांना विमा मिळावा ,पीक विम्याचा बीड पॅटर्न रद्द करावा, राष्ट्रीयकृत बँकेतील पीक कर्ज वाटप विनाविलंब करावे. आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं चार दिवसांपूर्वी आंदोलन केलं होतं. बीड- परळी रस्त्यावर घाटसावळी येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते.

 

Leave a Comment

error: Content is protected !!