दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांनाही मिळणार बोनस, पीएम किसान हप्त्याची रक्कम होणार दुप्पट?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आयटी क्षेत्रातील मोठ्या कंपन्या किंवा मल्टी नॅशनल कंपन्या दिवाळीपूर्वी त्यांच्या कामगारांना दिवाळी बोनस देत असल्याचे तुम्ही पाहिले किंवा ऐकले असेल. यावेळी सरकार आपल्या शेतकरी बांधवांसोबत असेच काही करू शकते. शेतकऱ्यांना दिवाळीची भेट देतानाच सरकारने काही महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहेत. ज्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळेल. वास्तविक, शेतकऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे, तुम्हीही शेतकरी असाल आणि पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घ्यायचा असेल आणि त्यासाठी तुम्ही आधीच अर्ज केला असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. .

हप्त्यांमध्ये होऊ शकतो दुप्पट नफा

माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी सरकार दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी तिजोरी उघडण्याची शक्यता आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत दिली जाणारी रक्कम दुप्पट म्हणजेच 6000 करण्याचा विचार सरकार करत आहे. सध्या सरकार पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 6000 रुपये देते. पण दिवाळी पाहता, सरकार ही रक्कम दिवाळीपूर्वी बोनस म्हणून 12000 रुपये करू शकते.असा अंदाज वर्तवला जात आहे. असे झाल्यास शेतकऱ्यांना 2000 पूर्वी देण्यात येणारा हप्ता वाढून 4000 रुपये होईल.

 30 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करू शकता, योजनेचा लाभ घेऊ शकता

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 10वा हप्ता शेतकरी 15 डिसेंबर 2021 पर्यंत मिळवू शकतात. या योजनेचा लाभ सर्व गरजू शेतकऱ्यांना मिळावा यासाठी शासन विशेष काळजी घेत आहे. त्याचबरोबर हा हप्ता मिळण्यासाठी लाखो शेतकरी दीर्घकाळ वाट पाहत आहेत. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही त्यांना ३० ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करता येईल.तुम्ही पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या योजनेसाठी अर्ज करू शकता. अर्ज केल्यानंतर कोणत्याही शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळेल. अशा परिस्थितीत ज्या शेतकरी बांधवांनी अद्याप आपली नोंदणी केलेली नाही, त्यांनी त्वरित अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी जेणेकरुन येणाऱ्या काळात तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणीला सामोरे जावे लागणार नाही.

 

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!