मोदी सरकारच्या ‘या’ योजनेद्वारे शेतकऱ्यांनाही मिळणार पेन्शन ; असा करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : इतर नोकरदार वर्गाप्रमाणे शेतकऱ्यांना पेन्शन नसते. त्यांना त्यांच्या शेतमालाच्या विक्रीवर आलेल्या पैशांवर अवलंबून रहावे लागते. मात्र मोदी सरकारने शेतकऱ्यांचा विचार करून ‘पीएम किसान मानधन’ योजना सुरु केली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षानंतर दर महिन्याला 3 हजार रुपये पेन्शन स्वरुपात मिळणार आहेत. याद्वारे शेतकऱ्यांना वर्षाला 36 हजार रुपये मिळवू शकतात.

योजनेचा उद्देश
या योजनेचा मुख्य उद्देश देशातील अल्पभूधारक आणि अल्पभूधारक शेतकर्‍यांना शासनाकडून 60 वर्षांनंतर मासिक 3000 रुपये पेन्शन देऊन आर्थिक सहाय्य करणे आणि त्यांच्या वृद्धापकाळातील आर्थिक गरजा भागवणे हा आहे. पीएम किसान मानधन योजना 2022 अंतर्गत शेतकर्‍यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणे आणि त्यांचे भविष्य सुरक्षित करणे आणि हरित देशातील शेतकर्‍यांचा विकास आणि बळकटीकरण करणे. हेच या योजनेचे उद्दिष्ट आहे.देशातील लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकरी या योजनेंतर्गत पात्र मानले जातील. 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी लागवडीयोग्य जमीन असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान असावे.

अशा आहेत अटी-नियम
–पीएम किसान मानधन योजनेमध्ये कोणत्याही शेतकऱ्यास सहभाग घेता येणार आहे.
–यामध्ये सहभाग नोंदवल्यानंतर त्याच्या 60 वर्षापासून पुढे महिना 3 हजार म्हणजेच वर्षाला 36 हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत.
— याकरिता शेतकऱ्यांना प्रीमीयम अदा करावा लागणार आहे.
–पंतप्रधान किसान मानधन योजनेअंतर्गत पेन्शन मिळण्यासाठी शेतकऱ्याचे वय 18 वर्षे ते 40 वर्षे दरम्यान असावे.
–या योजनेत त्यांना दरमहा 55 ते 200 रुपये जमा करावे लागणार आहेत.
–यानंतरच शेतकऱ्यांना 60 वर्ष पूर्ण झाल्यावर दरमहा 3 हजार रुपये पेन्शन मिळणार आहे.

कागदपत्रे
–आधार कार्ड
–ओळखपत्र
–वय प्रमाणपत्र
–उत्पन्न प्रमाणपत्र
–बँक खाते पासबुक
–मोबाईल नंबर
–पासपोर्ट आकाराचा फोटो

कसा कराल अर्ज
–या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याला प्रथम त्याच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये (सीएससी) जावे लागणार आहे.
–यानंतर तेथे सर्व कागदपत्रे सादर करून बँक खात्याची माहिती द्यावी लागणार आहे.
–कॉमन सर्व्हिस सेंटर आधार कार्डला तुमच्या अर्जाशी जोडेल.
–यानंतर तुम्हाला किसान कार्ड पेन्शन अकाउंट नंबर दिला जाईल.
–नंतर कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही या योजनेसाठी स्वत:ची नोंदणी करू शकता.

लॉगिन प्रक्रिया
–सर्वप्रथम तुम्हाला प्रधानमंत्री किसान मानधन योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. ( https://maandhan.in/shramyogi )
–आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
— होम पेजवर तुम्हाला साइन इन या पर्यायावर क्लिक करावे लागेल. ( https://maandhan.in/auth/login )
–यानंतर तुमच्या समोर खालील पर्याय उघडतील.
*सेल्फ एनरोलमेंट
*सीएससी vle
–तुम्हाला तुमच्या गरजेनुसार पर्यायावर क्लिक करावे लागेल.
–यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल.
–या पेजवर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, युजरनेम किंवा ईमेल आयडी, पासवर्ड, कॅप्चा कोड इत्यादी टाकावे लागतील.
–त्यानंतर तुम्हाला साइन इन पर्यायावर क्लिक करावे लागेल.
–अशा प्रकारे तुम्ही लॉगिन करू शकाल.

Leave a Comment

error: Content is protected !!