Seedless Guava : क्या बात है…! अखेर बिन बियांच्या पेरूचा शोध लागला; सांगलीतल्या शेतकऱ्याची कमाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पेरू हे फळ सर्वांनाच आवडते मात्र अनेकदा पेरूच्या (Seedless Guava) बिया दातात अडकत असल्यामुळे अनेकजण पेरू खाण्याचे टाळतात. एवढेच काय पेरूच्या बिया दातात अडकण्यावरून अनेक विनोदी मेसेजेस देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र आता अशा पेरूचा शोध लागला आहे ज्याच्यात बियाच नाहीत. होय …! तुम्ही अगदी बरोबर वाचलत. आपल्या महाराष्ट्रातल्या एका प्रगतिशील शेतकऱ्याने या ‘सीडलेस पेरूचा’ शोध लावला आहे.

महादेव सीडलेस

सांगलीतील प्रगतिशील शेतकरी महादेव सावंत यांनी या सीडलेस पेरूचा (Seedless Guava) शोध लावलाय. फुल उत्पादक म्हणून देखील त्यांची ख्याती आहे. त्यांनी या सीडलेस पेरूच्या जातीला ‘महादेव सीडलेस’ असं नाव देण्याचं ठरवलं आहे. येत्या 15 ऑगस्ट रोजी तिचं नामकरण करण्यात येणार आहे. महादेव सावंत हे प्रगतिशील शेतकरी असून ते आपल्या शेतामध्ये नेहमी वेगवेगळे प्रयोग करत असतात. एवढेच काय पश्चिम महाराष्ट्रात सर्वात आधी डच गुलाबाचं उत्पादन त्यांनी सुरू केलं. जिल्हा गुलाब उत्पादक संघाचे ते नऊ वर्ष अध्यक्ष होते. त्यांनी नर्सरीही सुरू केली. दहा वर्षांपूर्वी त्यांनी रामफळावर सीताफळ आणि सीताफळावर रामफळ असं देखील कलम केलं. आता त्यांचा हा नवा प्रयोग म्हणजे सीडलेस पेरू.

असा झाला शोध

महादेव सावंत सांगतात मागच्या दोन वर्षांपासून त्यांचं सिडलेस पेरूवर संशोधन सुरू होते. यंदाच्या वर्षी त्यांच्या या झाडाला 750 ग्रॅम ते एक किलो वजनाचा बिया नसलेले सीडलेस पेरू लागलेत. आणि विशेष म्हणजे या पेरूची (Seedless Guava) चवही सर्वांच्या पसंतीला उतरत आहे. या पेरूपासून भविष्यात रोपवाटिका तयार करून त्यांचा प्रसार करण्याचा संकल्प सावंत यांचा आहे.

एकही बी नसलेला पेरू

या सीडलेस पेरूचं वैशिष्ट्य म्हणजे या पेरूला एकही बी नाही महादेव सावंत यांचे सिडलेस पेरूवर (Seedless Guava) संशोधन सर्वसुन या पेरूचा एक झाड सध्या त्यांच्या नर्सरीत्या या झाडाला काही दिवसांपूर्वी एकमेकांना जोडलेला पेरू लागला होता याचे काप घेतले असता त्यामध्ये एकही बी नव्हतं आणि त्याची चवही छान होती या झाडाला सध्या बहर आला असून या झाडाला लागलेले सर्व पेरू हे सीडलेस आहेत त्याचा संकर करून नवा सीडलेस पेरू तयार करण्याचा मानस सावंत यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!