पारंपरिक शेतीला फाटा देत, तीन महिन्यात फ्लॉवर उत्पादक शेतकरी बनले लखपती!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या शेतकरी पारंपरिक शेतीसोबत वेगेवेगळे प्रयोग शेतीमध्ये करताना दिसतात. निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी पारंपारिक उसाच्या शेतीला फाटा देत फ्लॉवरचे पीक शेतात घेऊन चांगला नफा ते मिळवत आहेत.

एक एकरात 16 हजार फुलकोबी (फ्लॉवर) च्या रोपांची लागवड केली. 80 पैसे दराने फुलकोबी (फ्लॉवर) च्या रोपांची खरेदी केली. 30 हजार रुपये खर्च करत ड्रीपच्या सहाय्याने फुलकोबीला पाणी दिले. मग दीड ते पावणे दोन महिन्यात फुलकोबीचे पीक हातात आले. मोठ्या प्रमाणात ऊस लागवड होत असल्याने निफाड तालुक्यात निफाड सहकारी साखर कारखाना आणि रानवड सहकारी साखर कारखान्याची स्थापना करण्यात आली. मात्र गेल्या पाच ते सात वर्षांपासून हे साखर कारखाने बंद असल्याने ऊसाची विल्हेवाट लावणे जिकरीचे होऊन बसले. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पारंपारिक उसाच्या शेतीला फाटा देत शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्यास सुरुवात केली. भुसे, चापडगाव येथील शेतकऱ्यांनी फुलकोबीची (फ्लॉवर) शेती केली असून, यातून चांगला फायदा होत असल्याचे फुलकोबी उत्पादक शेतकरी सांगत आहेत.

दीड लाखांपर्यंतच्या उत्पन्नाची अपेक्षा

नाशिक मार्केटमध्ये फुलकोबीला मोठी मागणी आहे. एका फुलकोबीला (फ्लॉवर) किमान 15 रुपये दर मिळतो. आतापर्यंत एकरी 50 ते 60 हजार रुपये खर्च करण्यात आला. मात्र फुलकोबीतून दीड लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळण्याची अपेक्षा या शेतकऱ्यांना आहे. खर्च वजा जाता आजच्या बाजार भावानुसार 1 लाख रूपयांचे निव्वळ उत्पन्न मिळण्याची आशा आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!