उद्या दसरा … झेंडूला आलाय सोन्याचा भाव …!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा सण उद्यावर येऊन ठेपला आहे. मागील वर्षी कोरोनामुळे सण समारंभ सध्या पद्धतीने साजरे करण्यात येत होते. आता यावर्षी मात्र कोरेनाची लाट बऱ्यापैकी ओसरल्यामुळे बाजारांमध्ये तेजी दिसून येत आहे. दसरा दिवाळी या सणांना झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. यावर्षी देखील झेंडूच्या फुलांच्या दरात मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. कल्याण होलसेल मार्केटमध्ये झेंडूला ६० रुपये किलो भाव मिळत आहे. तर सामान्यबाजारात त्याची विक्री १०० रुपयांपर्यंत होताना दिसत आहे. तर इतर फुलांमध्ये देखील वाढझाल्याचे पहायला मिळत आहे.

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होलसेल मार्केटमध्ये झेंडू ६० रुपये किलो, शेवंती ८० रुपये किलो, गुलाब ८० ते १२० रुपये किलो आणि दसऱ्याची माळ ५० रुपयाला विकली जात होती. रिटेलमध्ये या दरात 20 रुपयाने वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिक आजच आपट्याची पानेही मोठ्या प्रमाणावर खरेदी करताना दिसत आहेत.सणासुदीच्या दिवसामध्ये झेंडूच्या फुलांना प्रंचंड मागणी असते. त्यानुषंगाने वाशिम जिल्ह्यातील झेंडू फुले तोडणीला वेग आला आहे. दोन वार्षपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या भीतीने वाशिम जिल्ह्यात यंदा झेंडूची लागवड निम्म्याहून अधिक घटली. त्यातच काही शेतकऱ्यांनी झेंडू शेती चांगली बहरली असून शेतकऱ्यांनी झेंडू फुले हैदराबाद मार्केटमध्ये नेली आहेत. त्यांना दसऱ्याला दिवशी झेंडूला प्रती किलो १०० रुपये भाव मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. दरम्यान पुढे काही दिवसांनी दिवाळी सण येत आहे त्यामुळे फुलांच्या दरात तेजीची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती बाजारभाव (14-10-21)

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये दिनांक 14 ऑक्टोबर रोजी मोगऱ्याची आवक 19 किलो झाली त्याचा किमान भाव हा 400 रुपये तर कमाल भाव 600 रुपये किलो इतका राहिला. काकडा आवक 786 किमान भाव 200 तर कमाल भाव 400 रुपये गुलछडी आवक 7155 किमान भाव 100 रुपये तर कमाल भाव 250 रुपये किलो, झेंडू आवक 1,57,990 किमान भाव 30 रुपये तर कमाल भाव 60 रुपये प्रति किलो, पांढरी शेवंती आवक 51012 किमान भाव 60 रुपये तर कमाल भाव 120 रुपये प्रतिकिलो. पिवळी शेवंती आवक 6823 किमान भाव 60 तर कमाल भाव 120 रुपये प्रतिकिलो. गुलाब आवक 8888 किमान भाव 10 तर कमाल भाव 30 रुपये प्रति गड्डी.

 

Leave a Comment

error: Content is protected !!