7 वर्षानंतर पहिल्यांदाच पुन्हा धुराळा उडाला…! बैलगाडा शौकिनांमध्ये उत्साह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : प्रदिर्घ सात वर्षाच्या कालावधीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व कोरोनाच्या नियमांचे पालन करत कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे येथे राज्यातील पहिल्या बैलगाडी शर्यतीचा धुरळा उडाला. नांगोळी येथे आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यतीत कोल्हापूरच्या संदीप पाटील यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावला.

कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे येथील माळरानावर हजारो शौकिनांच्या उपस्थितीत बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर व कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील बैलगाडी शर्यतीचे हजारो शौकिनांच्या शिट्या व टाळ्यांच्या गजरात तसेच जय शिवाजी जय भवानीच्या निनादात राज्यात पहिल्याच मानाच्या झालेल्या शर्यती संपन्न झाल्या.

पोटाच्या मुलाप्रमाणे जपले .. आज त्याचे चीज झाले

यावेळी स्पर्धेसाठी सहभागी असलेल्या अप्पा गाडगीळ यांनी सांगितले की, ७ वर्षांनंतर बैलगाडा शर्यती पुन्हा सुरु झाल्या आहेत. सरकारचे याबाबत आभार आहे. ७ वर्षांपासून आम्ही बैलांना दोन टाइम दूध तसेच चांगला खुराक घालून पोटच्या पोराप्रमाणे त्यांचा सांभाळ करीत आहोत. आज खऱ्या अर्थाने त्याचे चीज झाले असे वाटते आहे. पुढे देखील ह्या शर्यती अशाच चालू राहाव्यात अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

कोरोना नियमांचे पालन

शासनाने बैलगाडा शर्यती सुरु करण्यासाठी काही अटी आणि शर्थी पाळण्यास संगितले होते. आयोजकांच्या मते अटी पाळण्यात आल्या. मात्र प्रत्यक्षात ५० हुन अधिक प्रेक्षक मैदानावर पाहायला मिळाले. याबाबत आयोजकांनी सांगितले की आम्ही केवळ अशा बैलगाडा मालकाना स्पर्धेसाठी प्रवेश दिला ज्यांचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. मैदानावर ५० हुन अधिक गर्दी झाली मात्र तिथेही लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच प्रवेश दिला होता. तसेच शासनाने दिलेले सर्व नियम पाळल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!