शेतकऱ्यांनो ! चार कोटी डिजिटल ‘सातबारा’ची प्रत मिळणार मोफत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सातबाराचा उतारा म्हणजे शेतकऱ्यांसाठी मोठा जिव्हाळ्याचा विषय असतो. सध्या राज्यात सातबाराचा उतारा डिजिटल स्वरूपात नोंदवन्यात आला आहे. मात्र हाच सातबारा आता अंकीय म्हणजेच डिजिटल स्वाक्षरीसह ऑनलाइन स्वरूपात शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. सातबारा आता संगणकीय स्वरूपात आल्यामुळे कागदोपत्री त्याचे वाटप नको अशी भूमिका महसूल विभागाची होती परंतु बाळासाहेब थोरात यांनी महसूल अधिकार्‍यांची मानसिकता बदलण्यात यश मिळवले आहे. डिजिटल स्वरूपातला सातबारा आता मोफत शेतकऱ्यांच्या घरापर्यंत जाऊन पोहोचणार आहे.

ही मोहीम 2 ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे मात्र अतिवृष्टीमुळे पंचनाम्याच्या कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. तरीदेखील आतापर्यंत 80 लाख सातबारा मोफत वाटप करण्यात आले आहेत. एकाच खात्याच्या सातबारा उताऱ्यावर एकापेक्षा जास्त नावे असतात उताऱ्यावरील प्रत्येक नामधारक ग्रामस्थांना उत्तर दिली जात आहेत. राज्यात खातेदार शेतकरी जरी सव्वा कोटी असले तरी प्रत्यक्षात उताऱ्यावर चार कोटींपेक्षा जास्त नाव आहेत. त्यामुळे महसूल विभाग या सर्व हक्कदार व्यक्तींना मोफत उतारे वाटले जातील. ही मोहीम अनेक आठवडे राज्यभर चालू राहील अशी माहिती राज्याच्या संगणकीय सातबारा प्रकल्पाचे मुख्य समन्वयक रामदास जगताप यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांचा सातबारा तुम्ही विविध बदलांसह संगणकावर नेला आहे. मात्र सरकारने आपला सुधारित संगणकीय सातबारा नेमका कशा स्वरूपात आणला आहे याची उत्सुकता खेडेगावातील सामान्य शेतकऱ्याला आहे. आपण त्याला सातबाराची ही नवी प्रत मोफत द्यायला हवी अशी लोक हिताची भूमिका महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतली आहे. त्यामुळे महसूल विभागाची यंत्रणा आता चक्क चार कोटी उताऱ्यांचे मोफत वाटप करण्यात गुंतली आहे.

महसूल खाते नेमके काय करत आहे

— राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे कागदोपत्री असलेले सातबारा उतारे आता संगणकात साठवण्यात आले आहेत.
–साठवलेले उतारे अंकीय म्हणजे डिजिटल स्वाक्षरीसह ऑनलाइन स्वरूपात शेतकऱ्यांना उपलब्ध आहेत.
–हेच संगणकीय उतारे बँकांना तसेच कृषी विभागालाही उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
–महसूल मंत्र्यांच्या संकल्पनेनुसार संगणकीय उतारे आता पीडीएफ प्रोफाईल मध्ये रुपांतरीत केले जात आहेत.
–संगणकातील पीडीएफ रूपांतरित सातबाराची कागदी प्रत बाहेर काढली जात आहे.
–गावोगावी सातबारा उतारा ची ही प्रत शेतकऱ्यांना मोफत वाटली जात आहे.
–नव्या स्वरूपातील ही प्रत शेतकऱ्यांना देताना त्याचे वाचन दुरुस्ती आणि सुधारणाही काम देखील केली जात आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!