Free Electricity : युपीपाठोपाठ पंजाबमध्येही शेतकऱ्यांना मोफत वीज; अर्थसंकल्पात मोठी घोषणा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : अलीकडेच महाराष्ट्र सरकारने आपला अर्थसंकल्प (Free Electricity) सादर केला. मात्र, त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी कोणत्याही ठोस उपायोजना करण्यात आलेल्या नाही. मात्र, नुकतीच उत्तरप्रदेश सरकारने शेतकऱ्यांना शेतीसाठी मोफत वीज देण्याची घोषणा केल्यानंतर, पंजाब सरकारने देखील आपल्या शेतकऱ्यांना शेतीसाठी मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे. पंजाबमधील आम आदमी पार्टीच्या भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आज आपला अर्थसंकल्प सादर केला. यावेळी पंजाबचे अर्थमंत्री हरपाल सिंह चीमा यांनी ही घोषणा केली आहे. ज्यामुळे आता पंजाबमधील शेतकऱ्यांना देखील यूपीतील शेतकऱ्यांप्रमाणे शेतीसाठी मोफत वीज (Free Electricity) मिळणार आहे.

मोफत वीजेसाठी 9330 कोटींची तरतूद (Free Electricity In Punjab For Farmers)

पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचे सरकार असून, आप सरकारने 2024-25 या वर्षातील आपला अर्थसंकल्प आज सादर केला आहे. अर्थमंत्री हरपाल सिंह चीमा यांनी एकूण 2.04 लाख कोटींचा पंजाब राज्याचा अर्थसंकल्प मांडला. ज्यात आप सरकारने शेतीसाठी एकूण 13 हजार 784 कोटींचा खर्च यावर्षी प्रस्तावित ठेवला आहे. जो राज्याच्या एकूण अर्थसंकल्प निधीच्या 9.37 टक्के इतका आहे. याशिवाय आप सरकारने कृषीसाठी नियोजित केलेल्या खर्चाव्यतिरिक्त राज्यातील शेतकऱ्यांना मोफत वीज (Free Electricity) देण्यासाठी एकूण 9330 कोटींच्या निधीची तरतुदी केली आहे. असेही पंजाबचे अर्थमंत्री हरपाल सिंह चीमा यांनी पंजाब विधानसभेत अर्थसंकल्प मांडताना म्हटले आहे.

हेही वाचा : उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांना मोफत वीज; योगी सरकारकडून प्रस्तावाला मंजुरी! (https://hellokrushi.com/free-electricity-for-farmers-in-uttarpradesh-yogi/)

शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे

दरम्यान, याव्यतिरिक्त आप सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देताना, ‘मिशन उन्नत किसान’ या योजनेची घोषणा केली आहे. ज्याअंतर्गत पंजाबमधील 87 हजार शेतकऱ्यांना कापूस बियाणे खर्चावर 33 टक्के अनुदान दिले जाणार आहे. याशिवाय सरकारने राज्यात पीक विविधिकरण योजना राबविण्यास मान्यता दिली असून, त्यासाठी एकूण 575 कोटीचा निधी प्रस्तावित ठेवण्यात आला आहे. याशिवाय आप सरकारने कृषी प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी एकूण 250 कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. या सर्वांमध्ये आप सरकारने शेतकऱ्यांना मोफत विजेचे दिलेले गिफ्ट सर्वात मोठे मानले गेले आहे.

error: Content is protected !!