विदर्भात 18 ते 20 एप्रिलदरम्यान, उष्णतेची लाट…! तर राज्यात काही ठिकाणी पावसाला पोषक हवामान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यभरात तापमानवाढीचा अंदाज आहे. विदर्भात 18 ते 20 एप्रिलदरम्यान, उष्णेची लाट येणार आहे. कोकण पश्चिम महाराष्ट्रात 19 एप्रिलनंतर पावसाची शक्यता आहे.रविवारी चंद्रपूर आणि ब्रम्हपुरी येथे राज्यातलं सर्वाधिक म्हणजेच ४४.२ अंश तापमान होते. तर त्याच काळात म्हणजे 19 एप्रिलनंतर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात हलक्या पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. वर्धा, अकोला, नागपूरमधलं तापमान 42 ते 43 अंशांवर आहे. मराठवाड्यात 42अंश, तर मध्य महाराष्ट्रात पुणे, सोलापुरात ते 40 ते 41 अंशांवर आहे.

उष्णतेच्या लाटेचा इशारा
दरम्यान, वायव्य भारतात अद्यापही उष्णतेची लाट कायम आहे. तेथे तापमानात पुन्हा वाढ होणार असल्याने विदर्भात 18 ते 20 एप्रिल या कालावधीत काही ठिकाणी पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. महाराष्ट्रातही कमाल तापमानाचा पारा सध्याच्या तुलनेत काहीसा वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोकण पश्चिम महाराष्ट्रात पाऊस लावणार हजेरी
तसेच दक्षिण आणि पूर्वोत्तर भागांत पावसाळी वातावरण दिसून येत आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातही काही भागांत 19 एप्रिलनंतर हलक्या पावसाची शक्यता आहे. तर राजस्थानसह, पंजाब, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि जम्मू-काश्मीर या विभागातही तापमान वाढणार आहे. या भागातून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे गुजरात, मध्य प्रदेशानंतर विदर्भातही 18 एप्रिलनंतर उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे.दक्षिणेकडील काही राज्यांत पावसाळी स्थिती असल्याने त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या दक्षिण भागावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आदी भागांत तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

कुठे किती तापमान ?
दिनांक 17 एप्रिल रोजी राज्यात नोंदवण्यात आलेलं कमाल तापमान पुढीलप्रमाणे. रविवारी राज्यातल्या बहुतांश शहरांमध्ये कमाल तापमान हे चाळीस अंशांच्या वरती असलेले पाहायला मिळालं. यामध्ये परभणी 41.2, नांदेड 41, सोलापूर 40.8, चिकलठाणा 40.4, उस्मानाबाद येथे 40.1, बीड 42, मालेगाव 43.2, अकोला 43.4 ,अमरावती 42.5, बुलढाणा 41.2 ,ब्रह्मपुरी 44.2, चंद्रपूर 44.2, गडचिरोली 39.2 ,गोंदिया 42 पॉईंट दोन, नागपूर 42, वर्धा त्रेचाळीस ,वाशिम 42, यवतमाळ 42.5.

Leave a Comment

error: Content is protected !!