२०२१ – २२ आर्थिक वर्षापासून शेतकऱ्यांना असे मिळेल शून्य ( ०%) टक्के व्याजदराने कर्ज .

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : वाढती महागाई ,कृषी निविष्ठांच्या दरात झालेल्या भरमसाठ वाढीने राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला असुन अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना १ लाखापेक्षा जास्त कर्ज घेणे गरजेचे झालेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ३ लाख मर्यादेपर्यंतचे अल्प मुदत पीक कर्ज हे सरसकट ० % ( शून्य टक्के ) व्याजदराने मिळावे ही शेतकऱ्यांची अपेक्षा विचारात घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्त व नियोजन मंत्री अजीत पवार यांनी मार्च २०२१ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांना रुपये ३ लाख पर्यंतचे पीक कर्ज हे ० % ( शून्य ) टक्के व्याजदराने देण्याची घोषणा केली होती . १९८८ सालपासुन शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय असलेली व्याज सवलत योजना जीचे नामकरण डॉ .पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना करण्यात आले आहे ,तीची व्याप्ती वाढविण्याची बाब विचाराधीन होती. आता या संदर्भात शासनाने नुकताच आदेश काढत ” डॉ . पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना ” ही पीक उत्पादन प्रोत्साहन योजना संदर्भाधीन शासन निर्णयाद्वारे राज्यामध्ये अंमलात आणण्यात आलेली आहे. या योजनेमुळे ३ लाखांपर्यंत पीक कर्ज घेत वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शुन्य टक्के व्याजदराने कर्ज मिळणार आहे .

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सहकारी कृषी पतसंस्था मार्फत दिलेल्या पीक कर्जावरील व्याज दरात वसुलीशी निगडीत प्रोत्साहनात्मक सूट देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने २४ नोव्हेंबर १९८८ रोजी घेतला होता . शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा खरेदीसाठी अल्पदराने पिक कर्ज मिळावे व या कर्जाची परतफेड मुदतीत व्हावी यासाठी कर्जाच्या व्याजदरात सवलत देण्याची ही योजना शेतकऱ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय झालेली आहे . शासनाने वेळोवेळी या योजने मधील कर्ज मर्यादा व व्याज दरातील सवलत यामध्ये सुधारणा केलेली आहे. २ नोव्हें १९९१ साली १० हजार कर्ज घेत नियमित वेळेवर फेड करणाऱ्या शेतकऱ्याला ४% व्याज दर सुट देण्यात आलेली होती . यात हळूहळू कर्ज रक्कमेत वाढ झाली. सध्या शेतकऱ्यांना केंद्र शासन ३ लाख कर्ज मर्यादेपर्यंत अल्प मुदत पीक कर्जाची परतफेड विहित मुदतीत केल्यास सरसकट ३ % व्याज दरात सवलत देते मात्र राज्य शासन रू १लाख कर्ज मर्यादपर्यंत ३ % व्याज सवलत व १ लाख ते ३.०० लाख या कर्ज मर्यादेपर्यंत १ % टक्का व्याज दरात सवलत देते , यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना रु १लाखापर्यंत अल्प मुदत पीक कर्जाची परतफेड मुदतीमध्ये केल्यास एकूण व्याजदरात ६ % सवलत मिळून शेवटी त्यांना सदर कर्ज ० % ( शून्य टक्के ) व्याजदराने उपलब्ध होते . मात्र शेतकऱ्यांना १ ते ३ लाख या कर्ज मर्यादेमध्ये २ % व्याज भरावे लागते .

अशी असेल व्याज दरात सवलत 

सध्या शेतकऱ्यांना रु .१ लाख मर्यादेपर्यंत अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम विहित मुदतीत परतफेड केल्यास ३ % व्याज दरात सवलत देण्यात येते , ती कायम ठेवण्यात आली आहे . १ लाख ते रु ३ लाख या कर्ज मर्यादेमध्ये शेतकऱ्यांनी अल्प मुदत पीक कर्जाची परतफेड विहित मुदतीस केल्यास १ % व्याज दरात सवलत देण्यात येते . यामध्ये आता अधिक २ % व्याज दरात सवलत वाढवून देण्यात आली आहे . जेणेकरून या कर्ज मर्यादेत व्याजदरात एकूण ३ % व्याज सवलतीचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल , व्याज दरात सवलत सुधारणेमुळे शेतकऱ्यांना रु . ३.०० लाख कर्ज मर्यादेपर्यंत अल्प मुदत पीक कर्जाची परतफेड विहित मुदतीत केल्यास सरसकट ३ % व्याज सवलतीचा लाभ देण्यास सांगितले असून , ३ लाख मर्यादेपर्यंत अल्प मुदत पीक कर्ज घेवून त्याची मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाचे ३ % व्याज सवलत विचारात घेऊन कर्जदार शेतकऱ्यां ना शून्य टक्के ( 0 % ) व्याज दराने उपलब्ध होईल .

Leave a Comment

error: Content is protected !!