सांगलीच्या हळद आणि बेदाण्याला भौगोलिक मानांकन ; जाणून घ्या अधिकृत वापरकर्ता बनण्याची प्रक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सांगली येथे हळद आणि बेदाण्याची मोठी बाजारपेठ आहे. केवळ आसपासच्या बाजारातूनच नाही तर परराज्यातूनही शेतकरी येथे आपला माल विक्रीसाठी घेऊन येत असतात.विशेष म्हणजे आता सांगली येथील बेदाणा आणि हळद याकरिता भौगोलिक मानांकन मिळाले आहे. भौगोलिक सूचकांक मानांकन ही भारत सरकारतर्फे, उत्पादनांना त्याच्या दर्जानुसार व गुणवत्तेनुसार मानांकन देण्यासाठी राबविण्यात येणारी एक व्यवस्था आहे. भौगोलिक मानांकनाद्वारे उत्पादनाची वेगळी ओळख निर्माण होते. कृषी विभागाकडे बेदाण्यासाठी 550 तर हळदीसाठी 180 शेतकऱ्यांनी प्रस्ताव सादर केलेले आहेत. वापरकर्तासाठी हे प्रस्ताव असून आता पुढील प्रक्रिया पूर्ण पाडल्यानंतरच शेतकऱ्यांना या ब्रॅंडच्या नावाखाली याची विक्री करता येणार आहे.

मानांकान अधिकृत वापरकर्ता बनण्याची काय आहे प्रक्रिया

–भौगोलिक मानांकनाचा वापरकर्ता होण्यासाठी चेन्नई येथील मानांकन कार्यालयात नोंद करावी लागते.
–ही नोंदणी जानेवारी ते मार्च दरम्यान सुरु असते .
–याकरिता शेतकऱ्यांना केवळ 10 रुपयांचा खर्च आहे.
–आता या मानांकनासाठी अधिकच्या शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा म्हणून जिल्हानिहाय लक्षांक देण्यात आलेले आहे.
–यातील वापरकर्ता शेतकरी व्हायचे असल्यास कृषी विभागाकडे केवळ 10 रुपयांमध्ये नोंदणी होणार आहे. मात्र, खासगी संस्थाकडून तीन हजार रुपये आकारले जातात.

Leave a Comment

error: Content is protected !!