फुकटात घ्या ढबू ! ट्रॉलीभर ढबू फुकट वाटली ; बाजारभाव न मिळाल्याने शेतकरी हवालदिल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : दर पडल्याने शेतकऱ्याने फुकट ट्रॉलीभर ढबू मिर्ची फुकट वाटून टाकली. सांगली जिल्ह्यातील कुंभारगाव येथे हा प्रकार घडला. ढबू मिरचीचा दर कोसळल्याने शेतकरी भीमराव साळुंखे यांनी नाईलाजाने मिर्ची फुकट वाटली. ट्रॉलीभर ढबू मिरची अवघ्या २० मिनिटांत संपली.

या प्रकाराने शेतकऱ्याची दुर्दशा पुन्हा समोर आली आहे. करोनाचा संसर्ग, लॉकडाऊन आणि महापुरानंतर हळूहळू जीवन पूर्वपदावर येत आहे. या स्थितीत शेतक-यांच्या मागील संकटांची मालिका संपण्याचे नाव घेत नाही. महापुराने नदी काठांवरील शेती उद्ध्वस्त झाली आहे. पुरानंतर बाजारात भाजीपाल्याचे दर घसरल्याने पुन्हा शेतक-यांसमोर संकट निर्माण झाले आहे. कडेगाव तालुक्यातील कुंभारगाव हे गाव भाजीपाल्याचे माहेरघर म्हंटले जाते. याच गावातील भीमराव साळुंखे हे दरवर्षी २५ गुंठे ढोबळी मिरचीची लागवड करतात. ही मिरची ते मुंबई, पुणे येथे पाठवतात. वाहतूक, पॅकिंग, मजुरी यासाठी प्रतिकिलो किमान ६ रुपये खर्च येतो. प्रतिकिलो पंधरा रुपयाने दर जरी मिळाला तरी ९ रुपये किलोला ढोबळ नफा मिळत होता. यातून त्यांना चार पैसे हाती लागत होते.

प्रत्यक्षात मात्र बाजारात व्यापाऱ्यांकडून प्रति किलो पाच रुपये दरानेही खरेदी केली जात नाही. ढबू मिरची बाजारपेठेत आणू नका असे व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना सांगितले जात आहे. भीमराव साळुंखे यांनी चार दिवस पुणे, मुंबई, कोल्हापूर आणि सांगलीच्या मार्केट यार्डमध्ये मिरची पाठवली. मात्र चारही दिवस त्यांना प्रवास खर्चही निघाला नाही. रोज होणाऱ्या नुकसानीला कंटाळून रविवारी संध्याकाळी त्यांनी ट्रॉलीभर ढबू मिरची गावात फुकट वाटली.

Leave a Comment

error: Content is protected !!