उष्णतेपासून मिळणार सुटका…! राज्यातल्या 21 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’, वादळी वाऱ्यासह पाऊस लावणार हजेरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : विदर्भ मराठवाड्यासह राज्यात तापमानाचा पारा चढाच आहे. उष्णतेने लाही लाही होणाऱ्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे.कारण हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातल्या काही भागात उद्या म्हणजेच २१ एप्रिल पासून पाऊस हजेरी लावणार आहे. मात्र हा पाऊस अवकाळी असल्यामुळे वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह काही भागात पाऊस होणार आहे. त्यामुळे राज्यातील २१ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. हा पाऊस दिनांक 21 एप्रिल पासून 23 एप्रिल पर्यंत बरसणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे.

‘या’ भागात परसणार धुळीचे वादळ

दरम्यान इतर राज्यांचा विचार करता 20 आणि 21 एप्रिल रोजी राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेश मधील वेगवेगळ्या भागात धुळीचे वादळ येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर 21 आणि 22 एप्रिल रोजी पूर्व उत्तर प्रदेशामध्ये हे धुळीचे वादळ पसरेल. त्याचा वेग हा ताशी 25 ते 35 किलोमीटर राहील अशी शक्यता ही भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर मेघगर्जना आणि वादळी वाऱ्याची शक्यता ही केरळ तमिळनाडू, पुडुचेरी कराईकल, कर्नाटक, तेलंगणाच्या काही भागांमध्ये पुढच्या पाच दिवसांमध्ये होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. आज दिनांक 20 एप्रिल रोजी झारखंड मधील वेगवेगळ्या भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेली आहे. आज सकाळी नोंदवलेल्या निरीक्षणानुसार अरबी समुद्रावर काही भागांमध्ये दाट ढग जमा झालेले दिसत आहेत. यामध्ये गुजरातच्या किनारपट्टीचा देखील समावेश आहे.

‘या’ भागाला यलो अलर्ट

21 एप्रिल – उद्या दिनांक 21 एप्रिल रोजी बुलढाणा, वाशिम, अकोला ,यवतमाळ, अमरावती, वर्धा ,चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या भागात हलक्‍या पावसाची शक्‍यता आहे. तर पुणे, रत्नागिरी, सातारा ,सांगली ,कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली असून या संपूर्ण भागाला यलो अलर्ट देण्यात आला आहे.

22एप्रिल – दिनांक 22 एप्रिल रोजी हिंगोली, नांदेड, लातूर ,उस्मानाबाद ,सोलापूर, सांगली ,कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा आणि पुणे या जिल्ह्यांना अलर्ट दिला गेला असून या भागात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर वाशीम, यवतमाळ ,वर्धा, नागपूर, चंद्रपूर ,भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या भागात पावसाची शक्‍यता आहे.

23एप्रिल- दिनांक 23 एप्रिल रोजी वाशिम, परभणी, हिंगोली ,नांदेड, सोलापूर, पुणे ,सातारा ,सांगली ,कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल तर यवतमाळ ,वर्धा ,नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली ,भंडारा आणि गोंदिया या भागात पाऊस हजेरी लावेल.

Leave a Comment

error: Content is protected !!