महागड्या कीटकनाशकांना द्या सुट्टी ; जाणून घ्या ‘या’ उत्कृष्ठ जैविक कीटकनाशकाविषयी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सेंद्रिय शेतीमध्ये कीडरोग नियंत्रणासाठी कडुनिंब अत्यंत उपयुक्त ठरतो. कडुनिंबापासून निंबोळ्या किंवा पानांचा अर्क, निंबोळी तेल हे सर्वोत्कृष्ट नैसर्गिक कीड, रोग व जीवाणू नियंत्रक आहे. निबोळी पेंडही चांगल्या दर्जाचे सूत्रकृमीरोधक खत म्हणून वापरता येते.

कडुनिंबातील महत्त्वाचे घटक

कडुनिंबाच्या पाने व बियामध्ये खालील घटक अधिक प्रमाणात आढळून येतात.

)ऍझाडिरेक्‍टीन : या प्रमुख घटकामुळे किडी झाडापासून दूर राहणे, त्यांना अपंगत्व येणे या बाबी घडतात. साधारणतः हा 90 टक्के परिणामकारक असून, किडींचे जीवनचक्र संपुष्टात आणण्याची शक्ती या घटकांमध्ये आहे. 1 ग्रॅम बियांमध्ये 2 ते 4 मिली ग्रॅम ऍझाडिराक्‍टीन असते.

2)निम्बीन व निम्बीडिन: या महत्त्वाच्या घटकामध्ये विषाणूविरुद्ध क्रिया करण्याची शक्ती आहे. हा घटक पिकांवरील विषाणूजन्य रोगांवर, तसेच जनावरांच्या विषाणू रोगांवरसुद्धा नियंत्रणास उपयुक्‍त ठरतो.

3)मेलियान ट्रिओल: या घटकामुळे किडी झाडांची व रोपांची पाने खाऊ शकत नाही. टोळधाडीसाठीही परिणामकारक ठरू शकतो.

4)सालान्निन: हे पिकांवरील पाने खाणाऱ्या किडींवर प्रभावीपणे कार्य करते. भुंगे, खवले, कीटक यांवरसुद्धा प्रभावी आहे.

एकंदरीत कडुनिंबाच्या पानापेक्षा बियांमध्ये जैविक क्रिया करणारा घटक तीव्र असतो. त्यामुळे किडींच्या विविध प्रजातींवर परिणामकारक ठरते. त्यांच्या शरीररचनेत व क्रियेत बदल होऊन त्यांना अपंगत्व येते.

कडुनिंबाच्या अर्कापासून किडींच्या नियंत्रणाचा मार्ग

१) कडुनिंबापासून तयार करण्यात आलेला अर्क किडीस अंडी घालण्यास प्रतिबंधक, अंडीनाशक, कीडरोधक दुर्गंध, किडीस खाद्यप्रतिबंधक, किड वाढ रोधक व किटकनाशक या विविध मार्गाने परिमाण साधतो. पिकातील सुमारे 400 ते 500 प्रजाती नियंत्रणासाठी प्रभावी ठरतो.
२) अंडी घालण्यास प्रतिबंधात्मक कार्य-
कडुनिंब अर्कामुळे पिकावरील विविध किडीच्या मादी अंडी घालण्यापासून परावृत्त होतात. उदा. घाटे अळी (Helicoverpa Armigara) तंबाखूवरील पाने खाणारी अळी (Spodoptera Litura),
एरंडीवरील उंट अळी (Castor Semilooper)
पांढरी माशी,
गुलाबी बोंड अळी तसेच साठवून ठेवलेल्या धान्यामध्ये सुद्धा अंडी घालण्यास प्रतिबंध ठरते.
3 टक्के कडुनिंबाची वाळलेली पाने साठविलेल्या उडीद धान्यासाठी 5 महिन्यापर्यंत परिणामकारक ठरतात.

कार्य
या अर्कामुळे किडींची अंडी उबवण्यामध्ये अडचणी येतात. या प्रक्रियेत अंड्याच्या आतील म्हणजेच गर्भाशयातील ढवळाढवळीमुळे प्रभावी नियंत्रण करते. उदा. तंबाखूवरील पाने खाणारी अळी (Spodoptera Litura) व घाटे अळीवर कडुनिंबाचा अर्क चांगला अंडीनाशक म्हणून कार्य करतो.

३) कीडरोधक दुर्गंध
भारतीय शास्त्रज्ञ आर. एन. चोप्रा आणि एम. ए. हुसेन यांनी कडुनिंबापासून किड शोधक तीव्र गंधामुळे विविध किडींना दूर ठेवणे शक्‍य होते.
उदा. भुंगा, पांढरी माशी, घरमाशी, पिसू, जपानी किटक, लष्करी अळी, मिलीबग इत्यादी.
4) किडीस खाद्यप्रतिबंधक
कडुनिंबाच्या बियांपासून तसेच तेलापासून तयार केलेला अर्क पिकांवर फवारणीसाठी वापरला असता विविध प्रकारच्या किडीस खाद्यप्रतिबंध करतो. उदा. पांढरी माशी, घरमाशी, मिलीबग, लष्करी अळी, तुडतुडे, फुलकिडे, उंटअळी इत्यादी.
5) कीड वाढ रोधक
कडुनिंबातील अझाडिराक्‍टीन हा घटक किडीची वाढ थांबवतो, तसेच कात टाकण्यास प्रतिबंध करतो. त्यामुळे कीड गुदमरून मरण पावते. पांढरी माशी, घरमाशी, पिस बटाट्यावरील कोलोरॅडोकिड, लष्करी अळी इत्यादी प्रकारच्या किडींची वाढ थांबते. या व्यतिरिक्त कडुनिंबाच्या बियातील गरामध्ये मेथेनॉलिक या रासायनिक घटकामुळे तंबाखूवरील पाने खाणारी अळीची वाढ थांबते.
6) कीटकनाशक
कडुनिंबापासूनचे अर्क व कीडनाशके ही कीटकांवर बहुआयामी आंतरप्रवाही किटकनाशकाप्रमाणे कार्य करतात. मुख्यत्वे कडुनिंबाची पाने, फळे व झाडाच्या सालीपासून उत्तम किडनियंत्रक तयार करता येते. निंबोळी अर्कापासून किड नियंत्रण करणे हे त्याच्या तीव्रता व मात्रेची वेळ यावर अवलंबून असते.

नियंत्रित होणारे किटक

मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, ठिपक्‍याची बोंडअळी, गुलाबी बोंडअळी, हिरवी बोंडअळी, मुंगी प्रजाती, भुंगा प्रजाती, पाने गुंडाळणारी अळी, उंटअळी, तांबडी केसाळ अळी, तंबाखूवरील पाने खाणारी अळी, हिरवे ढेकूण, फळमाशी, ज्वारी व मक्‍यावरील खोडकिडा, टोमॅटोवरील सूत्रकृमी, कोळी, लाल कोळी, नाकतोडा, लाल ढेकूण, शेंडे व पाने पोखरणारी अळी, लष्करी अळी, झुरळ प्रजाती धान्य साठवणीतील किडे, मेंढ्यांवरील माश्‍या इत्यादी.

जैविक शेतकरी
शरद केशवराव बोंडे.
९४०४०७५६२८

Leave a Comment

error: Content is protected !!