गोकुळला देखील महापुराचा फटका, शासनाने अनुदान देण्याची गोकुळच्या अध्यक्षांची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : जिल्ह्यात आलेल्या महापुराचा फटका कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ मोठ्या प्रमाणात बसलाय. महापुराच्या पाण्याने जिल्ह्यातील अनेक गाव वेढली गेली. शिवाय महत्त्वाचे रस्ते देखील वाहतुकीसाठी बंद झाल्याने त्याचा परिणाम दूध संघाच्या संकलनावर झालाय. महापुराच्या काळात दूध संकलन आणि विक्रीमध्ये घट झाल्याने जवळपास 16 ते 17 कोटी रुपयांचं गोकुळ दूध संघाचं नुकसान झाले आहे.

नुकसान भरुन काढण्यासाठी सरकारने संघाला अनुदान द्यावं

गोकुळचे नुकसान भरून काढण्यासाठी सरकारने संघासाठी अनुदान द्यावं, अशी मागणी गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी केलीय. महापूर ओसरत असल्यामुळे संकलन सुद्धा पूर्ववत होत असून उद्यापासून पुण्या-मुंबईतील दूध विक्री देखील सुरळीत होईल अशी माहिती त्यांनी दिली आहे . महापुराच्या स्थितीमुळे जिल्ह्यात येत्या काळात चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनण्याची भीती पाटील यांनी व्यक्त केली असून महापुरामुळे जनावर दगावलेल्या दूध उत्पादकांना मदतीबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असं देखील विश्वास पाटील म्हणालेत.

महापुरात 22 ते 26 जुलै अखेर गोकुळ दूध संघाचं संकलन तब्बल 16 लाख 43 हजार लिटरने घटलंय. त्यामुळे जवळपास 6 कोटी 16 लाखांचा आर्थिक फटका संघाला बसला. इतकंच नाही तर या काळात पुणे मुंबईसारख्या मोठ्या शहरातील दूध विक्री तब्बल 20 लाख 88 हजारांची घट झाल्यानं त्याचाही 10 कोटी 44 लाखांचा आर्थिक फटका संघाला बसला आहे. एकूणच महापुराच्या काळात संकलन आणि विक्री मध्ये जवळपास 16 ते 17 कोटी रुपयांच नुकसान गोकुळ दूध संघाच झालं आहे.

कोल्हापूर येथील गोकुळ दूध उत्पादक संघ आणि गुजरातमधील अमूलकडून साधारण 22 लाख लिटर दुधाचा पुरवठा होतो. शिवाय सांगली-सातारा येथून इतरही काही दूध संघांकडून मुंबईला दूध पुरवठा होतो. गेल्या 2 दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात पूरस्थिती गंभीर होती. अनेक महामार्ग, रस्ते बंद होते. या भागांतील गोठ्यांवरही पूराचा परिणाम झाला. त्यामुळे गोकुळच्या दूध संकलनात काहीशी घट झाली.

Leave a Comment

error: Content is protected !!