खुशखबर! पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 मे रोजी जाहीर करणार PM Kisan चाआठवा हप्ता, आपणही साधू शकता संवाद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील संपूर्ण शेतकऱ्यांची नजर असलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या आठव्या हप्त्याची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा हप्ता थेट खात्यामध्ये जमा केला जातो. पी एम किसान योजनेचा 7 वा हप्ता 25 डिसेंबर 2020 रोजी जाहीर करण्यात आला. आता आठवा हप्ता 14 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर करणार आहेत

निवडणूक व कोरोना साथीच्या आजारामुळे आठवा हप्ता येण्यास उशीर झाला. पण आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार आहे याबाबतची माहिती कृषी मंत्रालयाने दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 मे रोजी म्हणजेच शुक्रवारी सकाळी 11 वाजता शेतकर्‍यांशी चर्चा करतील यानंतर ते पंतप्रधान किसान योजना अंतर्गत पुढचा हप्ता जाहीर करतील. मंगळवारी सकाळी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना या संदर्भात एक मेसेजही प्राप्त झाला आहे. या मेसेज मध्ये असं लिहिलं आहे की ‘माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 14 मे रोजी सकाळी अकरा वाजता सकाळी शेतकर्‍यांशी चर्चा करतील आणि पंतप्रधान किसान योजनेचा पुढील हप्ता जाहीर करतील’.

आपणही साधू शकता संवाद

दरम्यान या कार्यक्रमामध्ये आपणही सहभाग घेऊ शकता pmindiawebcast.nic. in या संकेतस्थळावरून आपण संपर्क करू शकता किंवा दूरदर्शनच्या माध्यमातून संपर्क करू शकता. तुम्हाला कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मनापासून निमंत्रण आहे असेही सांगण्यात आले आहे.

कुणाला मिळणार नाही योजनेचा लाभ ?

1)नियमानुसार या योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकर्‍याच्या नावे शेती असणे आवश्यक आहे.
2) यासह जमीन जर आजोबा किंवा शेतकऱ्याच्या वडिलांच्या नावावर असेल तर योजनेचा लाभ मिळणार नाही.
3)या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍याच्या नावे शेतीची जमीन असणे आवश्यक आहे.
4)जर कोणी आयकर विवरण भरत असेल तर ते पंतप्रधान किसान सन्मान निधीमधून वगळले जातील.
5)यामध्ये वकील, डॉक्टर, सीए इत्यादीही या योजनेच्या नाहीत.

ऑनलाइन यादीमध्ये नाव कसे तपासाल

1)यादीमध्ये आपले नाव तपासण्यासाठी आपण प्रथम अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर भेट दिली पाहिजे.
2)त्यानंतर तुम्हाला होम पेजवर फार्मर कॉर्नर वर क्लिक करावे लागेल.
3)यामध्ये तुम्हाला लाभार्थी यादीच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
4)लाभार्थी यादीवर क्लिक केल्यानंतर नवीन पेज उघडेल.
5)यावर आपण आपले राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव माहिती प्रविष्ट कराल.
6) यानंतर गेट रिपोर्टवर क्लिक करा.
7)संपूर्ण यादी आपल्या समोर येईल.

या व्यतिरिक्त, अधिक माहितीसाठी आपण या क्रमांकावर कॉल देखील करू शकता

— पंतप्रधान किसान सन्मान योजना लँडलाईन क्रमांक: 011—23381092, 23382401

— पंतप्रधान किसान सन्मान योजना टोल फ्री क्रमांक: 18001155266

–पंतप्रधान किसान योजना हेल्पलाईन क्रमांक: 155261, 0120-6025109

Leave a Comment

error: Content is protected !!