चांगली बातमी …! कापसातील तेजी कायम राहण्याचा अंदाज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो , कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. कापसाच्या दरातील तेजी कायम राहण्याचा अंदाज तज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे. हंगामातील सर्वाधिक चांगला दर हा कापूस पिकाला मिळाला आहे. सध्या कापसाला १२ हजार रुपयांपर्यंत कमाल भाव मिळतो आहे. कापसाची आवक सध्या कमी असली तरी कापसाची मागणी मात्र मोठी आहेत. त्यामुळे कापसाच्या दरातील तेजी कायम राहण्याचे संकेत व्यक्त करण्यात आले आहेत.

MCX मधील कापसाचे व कपाशीचे (Cotton Spot Rate) राजकोट मधील स्पॉट भाव (रु. प्रति १७० किलोची गाठी) मार्च महिन्यात वाढत होते. गेल्या सप्ताहात कापसाचे स्पॉट भाव १.३ टक्क्याने वाढून रु. ४५,१८० वर आले. या सप्ताहात कापसाचे स्पॉट भाव पुन्हा १.७ टक्क्याने वाढून रु. ४५,९४० वर आले आहेत. मे डिलिवरी भाव ३.३ टक्क्यांनी वाढून रु. ४५,७१० वर आले आहेत. कपाशीचे स्पॉट भाव १.३ टक्क्यांनी वाढून रु २,२८२ वर आले आहेत. कापसातील तेजी कायम राहील. (सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति १७० किलोची गाठी; कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

कापसावरील आयात शुल्क हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यामुळे त्याचा कापूस दरावर परिणाम होईल की काय? अशी भीती शेतकऱ्यांच्यामध्ये होती. मात्र सध्या तरी कापूस दरावर कोणताही परिणाम झाल्याचे दिसत नाहीये. शिवाय तज्ञांच्या मते कापसाच्या मागणीतील वाढही कायम राहण्याची शक्यता आहे. शिवाय कापसाला मिळत असणाऱ्या चांगल्या दरामुळे यंदा कापूस लागवड करण्याकडे अनेक शेतकऱ्यांचा कल राहू शकतो. कापूस लागवड क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ताजे कापूस बाजारभाव ?

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
01/05/2022
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल6890001150010000
30/04/2022
अमरावतीक्विंटल19594001210010750
सावनेरक्विंटल2200110001160011250
जामनेरहायब्रीडक्विंटल4490001100010000
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल13990001150010000
उमरेडलोकलक्विंटल3795001210012000
29/04/2022
अमरावतीक्विंटल19092001200010600
सावनेरक्विंटल2500110001160011250
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल13595001220011200
जामनेरहायब्रीडक्विंटल3790001100010700
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल9290001150010000
उमरेडलोकलक्विंटल8890001200011900
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल132393001232011980
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल15082501230010200

Leave a Comment

error: Content is protected !!