खुशखबर! यंदाच्या खरीप हंगामात सरकार 14,775 अतिरिक्त खर्च करणार, जाणून घ्या खतांची सबसिडी कशी मिळवाल ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पावसाळा तोंडावर आल्यामुळे आता देशातील शेतकऱ्यांना खरीपाच्या लागवडीचे वेध लागले आहेत. यंदा मान्सून देखील वेळेत येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आता पावसाळी पिके घेण्यासाठी लगबग सुरु आहे. खतांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे शेतकरी चिंतेत होता. मात्र केंद्र सरकारने DAP खतांवरील सबसिडी 500 वरून 1200 रुपयांपर्यंत वाढवल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी दिलेल्या माहितीनुसार क्रेंद्र सरकार दर वर्षी रासायनिक खतांच्या सबसिडीवर जवळपास 80,000 कोटी रुपये खर्च करते. यावर्षी DAP सबसिडी वाढवण्यासोबतच खरिपासाठी भारत सरकार 14,775 अतिरिक्त खर्च करणार आहे. अशी माहिती तोमर यांनी दिली आहे. शेतकऱ्यांना DAP खताची गोणी 2411 ऐवजी 1200 रुपयांना मिळणार आहे.

खतांची सबसिडी कशी मिळवाल ?

याबरोबरच आणखी एक ट्विट करत खतांची सबसिडी कशी मिळवाल ? याबाबत माहिती दिली आहे. सबसिडी मिळवण्यासाठी आधार कार्ड किंवा किसान क्रेडिट कार्डची माहिती द्यावी लागेल. त्यानंतर बायोमेट्रिक म्हणजेच तुमच्या हाताचा अंगठा मॅच झाल्यानंतर कंपनीच्या खात्यात सरकार सबसीडीचे 12111 रुपये dbt च्या माध्यमातून खात्यात ट्रान्सफर करेल. शेतकऱ्यांना DAP खताची गोणी 1200 रुपयांना मिळेल.

 

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!