खुशखबर…! यंदा राज्याच्या सर्व जिल्ह्यात समाधानकारक पाऊस ,पाण्याची चिंता मिटली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात पावसाने सर्वदूर समाधानकारक हजेरी लावली आहे आज दिनांक 23 रोजी कोकण मराठवाडा पश्चिम विदर्भात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता तर मध्य महाराष्ट्रासह उर्वरित राज्यात हलक्‍या ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थान जैसलमेर पासून जोधपुर गुणा अंबिकापूर कमी दाब क्षेत्राचे केंद्र बलेसर ते बंगालच्या उपसागरात पर्यंत विस्तारला आहे. पश्चिम राजस्थान परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. कमी दाबाच्या क्षेत्राचा पासून तेलंगणा पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे.

राज्यातील सर्व जिल्ह्यात समाधानकारक पाऊस

हवामान तज्ञ् के .एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी महाराष्ट्रासाठी चंगली बातमी आहे. 1 जून पासून पाउस सुरू झाल्यापासून प्रथमच असे चित्र दिसते, ज्यामध्ये राज्याच्या सर्व जिल्ह्यांत सरासरी व सरासरीपेक्षा जास्त पाउस झालेला दिसत आहे. पुढचे अजून काही दिवस पण राज्यात पावसाचे असल्याची माहिती होसाळीकर यांनी दिली आहे. त्यामुळे राज्याची पिण्याच्या पाण्याची तसेच शेतीच्या पाण्याची चिंता मिटणार आहे.

या भागात अलर्ट

कोकणातील पालघर, ठाणे ,रायगड, रत्नागिरी, मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, लातूर, जालना, विदर्भातील अकोला, वाशिम या भागात जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक पुणे नगर सातारा सोलापूर कोल्हापूर मराठवाड्यातील परभणी, हिंगोली  नांदेड आणि विदर्भातील बुलढाणा, अमरावती, वर्धा या भागात यलो अलर्ट तसेच वीज आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

 

Leave a Comment

error: Content is protected !!