आनंदाची बातमी …! आज सोयाबीनला मिळाला 7 हजारांचा दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : खरिपातल्या सोयाबीनला यंदाच्या वर्षी अतिवृष्टीने झोडपले. मराठवाड्यातला शेतकरी ज्याचे सर्वकाही सोयाबीनच्या शेतीवर अवलंबून आहे तो पुरता खचून गेला. केंद्र सरकार ने केलेली सोयाबीन पेंडची आयात त्यानंतर सोयाबीनचे दर एकदम खाली उतरले. मात्र दिवाळीनंतर सोयाबीनच्या दारात रोज वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे संयम बाळगून ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली आहे. त्यांना खरंच चांगला दर मिळेल अशी आशा सध्याचे बाजरातले चित्र बांघुन वाटते आहे. लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज मंगळवारी सोयाबीनला सौद्यामध्ये ७ हजारांचा दर मिळाला आहे तर पोटलीत तर सोयाबीनची खरेदी ही ६४५० रुपयांनी झाली आहे.

खरीप हंगामातील तूर वगळता सर्व पिकांची बाजारात आवक सुरु झाली आहे. हंगामाच्या सुरवातीला केवळ उडदाला चांगला दर होता आजही 7 हजार 300 रुपये दर टिकून आहे. पण उडदाच्या दरात पुन्हा वाढच झाली नाही. अखेर 4 हजार 500 वर असलेले सोयाबीन आज उडदाच्या बरोबरीने आले आहे.

सोयाबीनचे दर वाढत असतानाही आवक कमीच आहे. लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला 7 हजाराचा दर असतानाही केवळ 13 हजार पोत्यांची आवक झाली आहे. दर वाढूनही शेतकऱ्यांच्या अपेक्षा ह्या उंचावलेल्या आहेत. त्यामुळे दिवासाला 50 ते 60 हजार पोत्यांची आवक होणाऱ्या या बाजारपेठेत सध्या केवळ 10 ते 12 हजार पोत्यांची आवक सुरु आहे. दिवाळीनंतर आवक वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात केला जात होता. पण शेतकऱ्यांनी हा अंदाज फेल ठरवलेला आहे. आवक मर्यादित राहिल्याने सोयाबीनचे दर हे वाढत आहे. हे शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने सोयाबीनचे आवक ही मर्यादित राहिलेली आहे.

लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. मंगळवारी लाल तूर- 6200 रुपये क्विंटल, पांढरी तूर 5900 रुपये क्विंटल, पिंकू तूर 5900 रुपये क्विंटल, जानकी चना 4902 रुपये क्विंटल, विजय चणा 4900, चना मिल 4850, सोयाबीन 7000, चमकी मूग 7250, मिल मूग 6250 तर उडीदाचा दर 7300 एवढा राहिला होता.

 

Leave a Comment

error: Content is protected !!