शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून सरकार १८ भाषांमध्ये लाँच करणार खास चॅनेल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । केंद्रीय कृषी तथा शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी मंगळवारी राष्ट्रीय सहकारी विकास निगम (एनसीडीसी) चे सहकार  कॉप ट्यूब चॅनेल लाँच केले आहे. एनएसडीसी कडून सांगण्यात आले आहे की, वनस्टॉप चॅनेल च्या रूपात इंटरनेटवर आपले हे चॅनेल सुरु केले आहे. याच्या माध्यमातून हिंदी सोबत १८ राज्यातील क्षेत्रीय भाषांमध्ये कर्यक्रम प्रसारित होणार आहेत. या निमित्त ‘सहकारी समितीचे के गठन व पंजीकरण’ यांच्या मार्गदर्शनाचा व्हिडीओ जारी करण्यात आला आहे.

ट्विटवर तोमर यांनी, ‘एनसीडीसीच्या प्रयत्नांच्या लक्ष्याला गाठण्यासाठी केल्या जाणाऱ्या इको सिस्टीम/ रिफॉर्म चा हा भाग आहे. मोदीजींच्या स्वप्नांना साकार करण्यामध्ये सहकार क्षेत्राची नेहमीच मुख्य भूमिका राहिली आहे. आणि निश्चित पणे मोठ्या प्रमाणात योगदान आहे. भारतात सहकार क्षेत्राने मोठे अंतर कापले आहे. तसेच शेतकरी तसेच आर्थिक विकास च्या स्थितींमध्ये सुधारणा आणण्यात मोठे योगदान दिले आहे.’ असे लिहिले आहे.

लघु तसेच सीमांत क्षेत्रांच्या शेतकऱ्यांसाठी संघटन रूपात सहकार क्षेत्राने २९ कोटी सदस्य आणि ८. ५० लाखाहून अधिक संघटनांचे नेटवर्क बनविले आहे. असेही ते म्हणाले. हिंदी सोबत उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्यप्रदेश, बिहार, छत्तीसगढ, झारखंड, हरियाणा, हिमाचल, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, ओडिसा, मिझोराम, त्रिपुरा, केरळ, गुजरात, पंजाब आणि  कर्नाटक राज्यातील क्षेत्रीय भाषेत हे चॅनेल असणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!