शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS ! ‘या’ तारखेला PM किसान योजनेचा 9 वा हप्ता होणार जाहीर, मिळेल डबल फायदा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी! केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 9 वा हप्ता लवकरच जाहीर केला जाईल.नुकतेच केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी माध्यमांना सांगितले की, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत देशातील १० कोटींहून अधिक शेतकर्‍यांना 1, 37,192 कोटी रुपये वितरित केले गेले आहेत. आता सरकारने पंतप्रधान किसन यांचा 9 वा हप्ता वितरित करण्याची तयारी सुरू केली आहे. याबाबतचे वृत्त दैनिक जागरण ने दिले आहे.

असा मिळेल डबल फायदा

माध्यमांच्या वृत्तानुसार, सरकार 1 ऑगस्टपासून पंतप्रधान किसान योजनेतील 9 व्या हप्त्याचे वितरण शेतकऱ्यांच्या खात्यात करणार आहे. म्हणूनच, जर आपण अद्याप या योजनेसाठी नोंदणी केली नसेल तर ते आताच करा. या महिन्याच्या अखेरीस एखाद्या शेतकऱ्याने या योजनेसाठी नवीन नोंदणी केली आणि त्याचा अर्ज पडताळणी केली, तर त्याला दोन हप्ते एकत्र मिळतील.म्हणजेच योजनेचा आठवा आणि नववा हप्ता एकत्र मिळेल. त्याची एकूण रक्कम ४००० होईल म्हणजेच या योजनेचा डबल फायदा शेतकऱ्यांना मिळू शकेल.

इथे करा रजिस्ट्रेशन

पी एम किसान योजनेअंतर्गत घर बसल्या शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेचा लाभ घेण्याकरिता http://pmkisan.gov.in या संकेतस्थळावर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि तुम्ही पात्रतेत बसत असाल तर या संकेतस्थळावर जाऊन नवीन शेतकरी रजिस्ट्रेशन करू शकता.

या क्रमांकावर साधा संपर्क 

— पंतप्रधान किसान सन्मान योजना लँडलाईन क्रमांक: 011—23381092, 23382401

— पंतप्रधान किसान सन्मान योजना टोल फ्री क्रमांक: 18001155266

–पंतप्रधान किसान योजना हेल्पलाईन क्रमांक: 155261, 0120-6025109

–याशिवाय सोमवार ते शुक्रवारपर्यंत पीएम-किसान हेल्प डेस्क (PM-KISAN Help Desk) चा ई-मेल (Email) [email protected] यावर देखील संपर्क करू शकता.

Leave a Comment

error: Content is protected !!