रासायनिक खतांना उत्तम पर्याय हिरवे खत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । शेतीमध्ये होणाऱ्या रासायनिक खतांचा वापर यामुळे हल्ली मानवी आरोग्यावर परिणाम होताना दिसून येतो आहे. विशेषतः कर्करोगासारख्या आजारांना सहज निमंत्रण दिले जात आहे. जमिनी देखील सततच्या रासायनिक खतांच्या माऱ्यामुळे आपली सुपीकता गमावून बसल्या आहेत. जमिनीचा पोत खराब होताना दिसून येतो आहे. अलीकडच्या काही वर्षांमध्ये याकडे गंभीर समस्या म्हणून पाहिले जात आहे. आणि यावर उपाय म्हणून सेंद्रिय खताला प्राधान्य दिले जात आहे. मात्र तरीही कमी कालावधीत अधिक पीक घेण्याच्या नादात बहुतांश रासायनिक खतांचा वापर दिसून येतो आहे. रासायनिक खतासाठीचा पर्याय अगदी सहज उपलब्ध असेल तर त्यांचा वापर नक्कीच कमी होवू शकतो. हिरवे खत हा रासायनिक खतांसाठी एक उत्तम पर्याय आहे. ज्यामुळे लागवडीचा खर्चही कमी येतो. आणि पीकही उत्तम आणि अधिक येते.

हिरवे खत म्हणजे दुसरे तिसरे काही नाही तर वेगाने वाढणारी पाने असणारी पिके होय. अशी पिके फळ येण्यापूर्वी नांगरणी करून जमिनीत दाबली जातात. हिरव्या खतामुळे जमिनीला   नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त/झिंक, तांबे, मॅंगनीज आणि लोह इत्यादीचा सहज पुरवठा होतो. रासायनिक खतांसाठीच्या पर्यायामध्ये हिरवे खत सहज उपलब्ध करता येणारे, कमी वेळेचे आणि कमी खर्चिक आहे म्हणायला हरकत नाही. शेण, कंपोस्ट, हिरवे खत इत्यादी सेंद्रिय खतांचा वापर रासायनिक खतांना पर्याय म्हणून करता येतो. यापैकी हिरवे खत (Green Fertilizer) हे सर्वात सोपे आणि उत्तम साधन आहे. हिरव्या खतामुळे प्रामुख्याने जमिनीची गुणवत्ता सुधारते. पर्यायी जलधारण क्षमता वाढते. जमिनीचा पोत सुधारल्यामुळे जमितीतील विविध घटकांसोबत पिकाच्या उत्तम वाढीसाठी आवश्यक सूक्ष्मजीवांच्या संख्येतही वाढ होते. परिणामी जैविक क्रियांची वाढ होते. या खतांमुळे पिकामधील तण वाढत नाही.

हिरवे खत तयार करण्यासाठी वेगाने वाढणारी पिके घ्यावी लागतात. या पीकाची लागवड केल्यानंतर ३०-४० दिवसांनी हे खत मातीत घातले जाते. या पिकांची मुळे खोल तसेच पिकामध्ये वातावरणातील नायट्रोजनचे तर्कसंगत करण्याची क्षमता असणारी असणे देखील खूप गरजेचे असते. तसेच या पिकाची पाणी आणि पोषक द्रव्याची मागणी देखील कमी असणे आवश्यक असते.

खत बनविण्याची  पद्धत अगदी सोपी आहे. खतासाठी पेरलेले पीक ३०-४० दिवसांनी जमिनीत मिसळायचे. ते मिसळले की १०-१५ किलो युरिया फवारणी करायची ज्यामुळे रोपांचे विघटन लवकर होते. सूक्ष्मजीव त्याचे विघटन करतात. ज्याचा खत म्हणून पिकाला फायदा होतो. अर्थात पेरणी करण्यापूर्वी हिरवे खत मातीत घालायचे असते.  हिरवे खत अधिक खोलवर मिसळू नये कारण हे पोषक तत्वांना खूप खोलवर दडपते. शेतात एका विशिष्ट टप्प्यावर पीक पलटी केल्यास तुम्हाला जास्तीत जास्त नायट्रोजनचा फायदा होतो. मसूर, मूग, उडीद, गवार, लोबिया इत्यादी पिके हिरव्या खतासाठी वापरली जातात.

Leave a Comment

error: Content is protected !!