Halad Bajar Bhav : हळद दरात 700 रुपयांनी घसरण; विक्रमी आवकचा परिणाम!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : हळदीच्या दरात (Halad Bajar Bhav) सध्या काहीसा चढ-उतार पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बाजारात हळद विक्रीस न्यावी की नाही याबाबत संभ्रम निर्माण होत आहे. त्यातच आज (ता.22) राज्यातील हळदीची प्रमुख बाजारपेठ असलेल्या हिंगोली बाजार समितीत अचानक आवक वाढल्याने हळद दरात घट पाहायला मिळाली आहे. हिंगोली बाजार समितीत आज हळदीला कमाल 12 हजार 700 रुपये प्रति क्विंटल तर वाशीम बाजार समितीत हळदीला 11 हजार 900 रुपये प्रति क्विंटल दर (Halad Bajar Bhav) मिळाला आहे.

हिंगोली मार्केटमध्ये विक्रमी आवक (Halad Bajar Bhav 700 Rupees Fall price)

हिंगोली बाजार समितीत आज हळदीची विक्रमी 2500 क्विंटल आवक (Halad Bajar Bhav) झाली आहे. जी मागील आठवड्यात 18 तारखेला 800 क्विंटल इतकी नोंदवली गेली होती. अचानक वाढलेल्या आवकेमुळे आज हिंगोली बाजार समितीत प्रति क्विंटलमागे 700 रुपयांची घसरण झाली आहे. बाजार समितीत आज हळदीला कमाल 12 हजार 700 रुपये किमान 10 हजार 500 रुपये तर सरासरी 11 हजार 600 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. जो मागील आठवड्यात 18 तारखेला कमाल 13 हजार 400 ते किमान 11 हजार 300 तर सरासरी 12 हजार 350 रुपये प्रति क्विंटल इतका नोंदवला गेला होता.

अन्य बाजार समित्यांमधील दर

दरम्यान, मुंबई येथील बाजार समितीत आज हळदीची 70 क्विंटल आवक झाली असून, कमाल 21000 ते किमान 14000 रुपये तर सरासरी 17500 रुपये प्रति क्विंटल दर त्या ठिकाणी हळदीला (Turmeric Rate) मिळाला आहे. वाशीम बाजार समितीत आज हळदीची 90 क्विंटल आवक झाली असून, कमाल 11900 ते किमान 9500 रुपये तर सरासरी 10000 रुपये प्रति क्विंटलचा दर हळदीला मिळाला आहे.

साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांना फटका

ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये हळदीला सरासरी 14 ते 15 हजार रुपयांचा भाव (Halad Bajar Bhav) मिळाला होता. त्यानंतर ऑक्टोबरपासून भावात जवळपास क्विंटलमागे दोन ते तीन हजारांनी घसरण झाली. ज्या शेतकऱ्यांनी भाववाढीच्या अपेक्षेने हळद विक्रीविना ठेवली होती. तसेच ज्या व्यापाऱ्यांनी हळद चढ्या दरात खरेदी केली, ते भाव कोसळल्यामुळे अडचणीत आले आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!