हळदीवरील प्रादुर्भावाकडे आतापासूनच लक्ष असू द्या; कंदमाशीला आळा घालण्यासाठी ‘या’ गोष्टी करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सद्य परिस्थितीमध्ये शेतात गेल्यानंतर मुंगळ्याच्या आकाराचे कंदमाशीचे प्रौढ उडताना मोठ्या प्रमाणात दिसून येत असून त्याकरिता वेळीच लक्ष देऊन खालील प्रमाणे व्यवस्थापनाच्या उपाययोजना कराव्यात. Halad Kid Niyantran

कंदमाशी
कंदमाशी ही हळद पिकावरील नुकसान करणारी प्रमुख कीड आहे. कंदमाशीचा प्रौढ डासासारखा परंतु मुंगळ्याप्रमाणे आकाराने मोठा व काळसर रंगाचा असतो. प्रौढ माशीचे पाय शरीरापेक्षा लांब असतात. पायांची पुढील टोके पांढऱ्या रंगाची असतात. दोन्ही पंख पातळ व पारदर्शक असून, त्यांच्यावर राखाडी रंगाचे दोन ठिपके असतात. Halad Kid Niyantran

ज्या ठिकाणी हळदीचे कंद उघडे पडलेले असतील त्या ठिकाणी जमिनीलगत प्रौढ माशी अंडी देते व अशा अंड्यातून अळ्या बाहेर पडून उघड्या गड्डयामध्ये शिरून त्यांच्यावर उपजीविका करतात. अशा गड्डयामध्ये नंतर बुरशीजन्य रोगांचा आणि काही सुत्रकृमींचा शिरकाव होतो. त्यामध्ये खोड व गुद्दे मऊ होतात व त्यांना पाणी सुटून ते कुजतात. Halad Kid Niyantran

जास्ती दिवस लांबलेला पावसाळा कंदमाशीसाठी अधिक प्रमाणात अनुकूल असतो. वेळीच लक्ष दिले नाही तर या कीडीमुळे हळद पिकामध्ये ४५ ते ५० टक्के नुकसान होते. ही कीड जुलै-ऑगस्ट ते पिकाच्या काढणीपर्यंत नुकसान करते.

व्यवस्थापनाचे उपाय :
१. जुलै ते ऑक्टोंबर दरम्यान १५ दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस २५% टक्के २० मि.ली. किंवा डायमिथोएट ३० टक्के १० मि.ली. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे सोबत चांगल्या दर्जाचे स्टिकर मिसळून आलटुन-पालटून फवारावे. Haldivaril KandMashi Niyntran

२. उघडे पडेलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. वेळेवर हळदीची भरणी करावी.

३. तसेच जमिनीतून क्‍लोरपायरीफॉस ५० टक्के ५० मि.लि. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात घेऊन आळवणी करावी. याच पद्धतीने आळवणी एक महिन्याच्या अंतराने प्रत्येक महिन्यात एकदा करावी.

४. कंदमाशी मुळे कंद कूज झाली असल्यास मुख्य किटकनाशकासोबत एका बुरशीनाशकाची तज्ञांच्या सल्ल्याने मिसळून आळवणी करावी.

५. त्याचबरोबर एकरी २-३ पसरट तोंडाची भांडी वापरून प्रत्येक भांड्यात एरंडीचे २०० ग्रॅम भरडलेले बी घेऊन त्यात १ ते १.५ लिटर पाणी घ्यावे. ८ ते १० दिवसांनी या मिश्रणामध्ये तयार होणाऱ्या विशिष्ट गंधाकडे कंदमाशीचे प्रौढ आकर्षित होतात व त्यात पडून मरतात.

६. हळद पीक काढल्यानंतर शेतात राहिलेल्या पिकांचे अवशेष, सडके कंद जमा करून नष्ट करावेत. Halad Kid Niyantran

(संदर्भ: हळद संशोधन केंद्र, कसबे डिग्रज जि. सांगली)

अशाप्रकारे कंद माशीच्या प्रादुर्भावास वेळीच लक्ष देऊन व्यवस्थापनविषयी योग्य उपायोजना करून भविष्यात होणारे नुकसान टाळावे. Haldivaril Kandmashi Niyntran

टीप : हळद पिकावर केंद्रीय कीटकनाशक मंडळातर्फे लेबल क्‍लेम नसल्याने विद्यापीठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत. Halad Kid Niyantran

अधिक माहितीसाठी संपर्क करा
कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ
परभणी
☎ ०२४५२-२२९०००

Leave a Comment

error: Content is protected !!