शेतीच्या विक्रमी उत्पादनात हांगे हायटेकचा महत्वपूर्ण वाटा : अरविंद शिंदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राजू पिसाळ , सातारा

सध्या शेती व्यवसाय करताना शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरल्यास शेती मध्ये कधीच तोटा होणार नाही शेतामध्ये कोणत्याही पिकाचे विक्रमी उत्पादन काढताना शेतीची मशागत त्याच बरोबर उत्तम प्रकारचे बियाण्याची निवड केल्यास विक्रमी उत्पादन निघू शकते हे आज सिद्ध झाले आहे याचे श्रेय द्यायचे झाले तर ते हांगे हायटेक नर्सरी ला जाते असे गौरौउद्गार प्रगतशील शेतकरी अरविंद शिंदे यांनी काढले. ते पुसेसावळी ता.खटाव येथे कलिंगड पीक पाहणी आणि शेतकरी परिसंवाद कार्यक्रमात बोलत होते.यावेळी कलश सिडस चे प्रकाश बड्दरे,गणेश पाटील, गोरेगावचे सरपंच चंद्रकांत शिंदे, लाडेगावचे माजी सरपंच संतोष कदम, हांगे हायटेक नर्सरीचे संचालक आबासाहेब हांगे, चंद्रकांत कारंडे, सूरज पवार,सुहास शिंदे यांची उपस्थित होती.

पुढे म्हणाले की, शेतीमध्ये नवे तंत्रज्ञान आणि बाजारपेठ याचा विचार करून पिके घेतल्यास नक्कीच चांगल्या प्रकारचे उत्पादन मिळू शकते त्याच बरोबर प्रत्येक पीक घेतना चांगल्या शुद्ध प्रकारचे बियाण्याची निवड करायला हवी पूसेसावळी परिसरात हांगे हायटेक नर्सरी च्या माध्यमातून शेतकऱ्यांना ऊस कांदा कलिंगड पपई झेंडू त्याच बरोबर चांगल्या प्रकारचे फळभाजी रोपांची उपलब्धता आबासाहेब हांगे यांनी करून दिल्याने परिसरातील शेतकऱ्यां च्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दोन महिन्यापूर्वी हांगे हायटेक नर्सरी मधून लागण केलेली मेलोडी जातीच्या कलिंगडाची रोपांची चांगल्या प्रकारे वाढ होऊन एकरी वीस ते बावीस टन कलिंगडाचे उत्पादन निघेल.यावेळी परिसरातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. प्रास्ताविक संतोष कदम यांनी केले.तर आभार प्रकाश बडदरे यांनी मानले.

Leave a Comment

error: Content is protected !!