अलर्ट ..! कोकण, मध्यमहाराष्ट्रसह विदर्भ, मराठवाड्यात आजही जोरदार पाऊस बरसणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी शुक्रवारी देखील जोरदार पाऊस होण्याची शक्‍यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. 23 जुलै रोजी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. हवामान विभागाकडून शुक्रवारी देखील मुंबईत जोरदार पाऊस होण्याचा इशारा देण्यात आलाय. नाशिक, औरंगाबाद, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला आणि नागपूर या जिल्ह्यात सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे. तर कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, येथे महापूर आला असून चोहोबाजूंनी पुराच्या पाण्याने वेढलेलया चिपळूणची अवस्था भीषण झाली आहे.

पुढच्या तीन तासात येथे मुसळधार पाऊसाची शक्यता

हवामान तज्ज्ञ के . एस होसलायक्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार आज कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ मराठवाडा येथे देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. औरंगाबाद, जालना, जळगाव, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, आणि सांगलीमध्ये पुढच्या तीन तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याच्या मुंबई विभागाने व्यक्त केली आहे

कोकणात सर्वच भागात अतिवृष्टी झाली. हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली केल्याचे ढगफुटीमुळे रत्नागिरी जिल्ह्यात अनेक गावात जलमय झाली आहेत. कोल्हापूरमध्ये एका दिवसात पाणी नद्यांच्या पात्राबाहेर पडले आहे. कोयना धरणात पाण्याची मोठी वाढ झाली आहे. निम्न दुधना तून 12492 क्युसेक विसर्ग सुरुवात झाली आहे. विष्णुपुरीचे पाच दरवाजे उघडे आहेत.

200मी मी पेक्षा आधीक पावसाची ठिकाणे

जव्हार 434, वाडा 418, माथेरान 331.4 कर्जत 321.8 पेठ 315, लोणावळा कृषी 113.1 मुखेड 200 89.7, विक्रमगड 131,वाडा 218, खालापूर 202 महाड 207, पोलादपूर 271, सुधागड, पाली 220, लांजा 220, संगमेश्वर 252, मुरबाड 226, शहापुर 205, गगनबावडा 265, हर्सूल 232, इगतपुरी 240, ओझरखेडा 249.2, त्र्यंबकेश्वर 216.

Leave a Comment

error: Content is protected !!