आज कोकण , मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला मुसळधार पावसाचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यात पावसाचा जोर वाढतो आहे. आज दिनांक सात रोजी कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भात हलक्‍या ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

या भागात कमी दाबाचे क्षेत्र

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकला असून राजस्थान बिकानेर पासून जयपुर, गुणा, गोंदिया ते बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत सक्रिय असलेल्या महाराष्ट्राच्या दक्षिण भागात समुद्रसपाटीपासून 3.1 ते 7.6 किलोमीटर उंचीवर परस्परविरोधी वारे वाहत आहेत. बंगालच्या उपसागराच्या उत्तर आणि पूर्व मध्यभागात ओडिशा आणि आंध्र प्रदेशात येणाऱ्या लागत हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहेत. त्याला लागूनच समुद्रसपाटीपासून 7.6 किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. पुढील दोन ते तीन दिवसात ही प्रणाली मध्ये भारताकडे सरकण्याची शक्यता आहे.

आज कोकण ,मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला इशारा

कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्र, पूर्व विदर्भासह मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ऑरेंज अलर्ट

कोकण विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि पालघर. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना आणि परभणी, हिंगोली, नांदेड, बीड या भागांना ऑरेंज अलर्ट म्हणजेच मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

यलो अलर्ट

उत्तर कोकणातील मुंबई मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर, मराठवाड्यातील, उस्मानाबाद, लातूर, विदर्भातील, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या भागांना येलो अलर्ट म्हणजेच जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय.

Leave a Comment

error: Content is protected !!