पावसाची रब्बीतही एंट्री ; येत्या 5 दिवसात कोकण-मराठवाड्यात जोरदार बरसणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगामात जोरदार धडाका दिलेल्या पावसाने रब्बीतही एंट्री मारली आहे. काल (१४) पंढरपूरसह राज्यातल्या काही भागात हलक्या ते माध्यम स्वरूपच्या अवकाळी पावसाने हजेरी लावली. इथून पुढे पाच दिवस राज्यात जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुण्यासह मुंबईला हाय अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे रब्बीच्या पेरणीचा पुन्हा प्रश्न निर्माण झाला आहे.

पुण्यासह एकूण 13 जिल्ह्यांना येलो अलर्ट

–हवामान खात्याने आज पुण्यासह एकूण 13 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.

–यामध्ये पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे.

–पुढील 3-4 तासांत संबंधित जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस धडकण्याची शक्यता आहे.

–आज सकाळपासूनच याठिकाणी ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे.

–पुढील पाच दिवस कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची हीच स्थिती कायम राहणार आहे.

पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र ओसरल्यानंतर, दक्षिण अंदमान समुद्र आणि लगतच्या थायलंड किनाऱ्यावर हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. पुढील काही दिवसांत याचं चक्रिवादळात रुपांतर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा परिणाम म्हणून दक्षिणेकडील राज्यांसह महाराष्ट्रात पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील पाचही दिवस अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

मराठवाड्यात काही ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय वाढ

दुसरीकडे, दक्षिण अंदमानच्या समुद्रात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता 15 नोव्हेंबरनंतर वाढणार आहे. 18 नोव्हेंबरपर्यंत हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राची व्याप्ती आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीपर्यंत वाढणार आहे. याचा परिणाम म्हणून उत्तरेकडील थंड हवेचा जोर कमी झाला असून किमान तापमानात वाढ झाली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय वाढ नोंदली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!