Weather Update : राज्यात पावसाचा जोर कायम ; हवामान खात्याकडून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या (Weather Update)जवळपास सर्वच भागात पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली आहे. येत्या चार ते पाच दिवसात राज्यामध्ये मान्सून सर्वाधिक सक्रिय राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या कालावधीमध्ये कोकण मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार (Rain) पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

तर विदर्भ मराठवाड्यातही काही भागांमध्ये मुसळधार(Weather Update) पावसाची शक्‍यता आहे. पाचव्या दिवशी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पाऊस पडणार अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे याबाबतची माहिती हवामान तज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे.

पाऊस आणि अलर्ट

7-जून – आज दिनांक सात रोजी पुणे ,सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे. या भागात मुसळधार ते अति मुसळधार (Rain) पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई आणि चंद्रपूर या भागाला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. औरंगाबाद जालना परभणी नांदेड हिंगोली, वाशिम बुलढाणा अकोला यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर गोंदिया आणि गडचिरोली या भागाला येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर राज्यातील उर्वरित भागात हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे.

8जून – उद्या दिनांक 8 जून रोजी पुणे, रायगड ,रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि पालघर या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर उद्या नाशिक जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. शिवाय नंदुरबार धुळे जळगाव औरंगाबाद अहमदनगर जालना बुलढाणा अकोला वाशिम लातूर यवतमाळ या भागाला येलो अलर्ट (Rain) देण्यात आला आहे.

शेती पाण्याखाली गेली, जनावरे वाहून गेली

मुसळधार पावसाने कुर्हावासी तसेच शेतकऱ्यांचे संकट वाढले. जोरदार पावसाने तसेच ढगफुटी झाल्याने कुर्हा परिसरातील वडळी, मार्डा, छिंदवाडी, कौंडण्यपूर, मिर्जापूर, आखतवाडा, भारसवाडी, वरखेड क्षेत्रातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पुरात काही जनावरे तसेच शेड देखील वाहून गेले. मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने अधिकाऱ्यांनी पाहणी करीत पंचनामे न केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.

राज्यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या 15 तुकड्या तैनात

मुंबई ( कांजूरमार्ग 1 घाटकोपर 1) -2, पालघर – 1, रायगड – महाड- 2, ठाणे – 2,रत्नागिरी-चिपळूण -2, कोल्हापूर-2, सातारा-1, सिंधुदुर्ग-1 राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (Weather Update) (एनडीआरएफ) एकूण 13 टीम तैनात आहेत.तर नांदेड-1,गडचिरोली-1 अशा एकूण दोन राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या तुकड्या तैनात केलेल्या आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!