दिलासादायक ! यंदा ‘महाबीज’च्या सोयाबीन बियाण्यांच्या दरात वाढ नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगामासाठी महाबीज सोयाबीन बियाण्याचे दर जाहीर केले आहेत. यंदाच्या वर्षी सोयाबीनचे बियाणे दरामध्ये मध्ये कोणतीही दरवाढ केली गेली नाही. ही बाब शेतकऱ्यांसाठी दिलासादायक मानली जात आहे. दरम्यान कृषी मंत्री दादा भुसे यांनी बियाण्याचे दर महाबीजने वाढवू नये असं आवाहन केलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत प्रशासनाने गतवर्षीचे दर कायम ठेवले आहेत. दुसरीकडे यंदा सोयाबीन महागले असतानाही महाबीजने बियाण्याची दरवाढ न केल्याने आता खाजगी कंपन्यांच्या दरानं कडे लक्ष लागले आह.

महाबीज कडून राज्यातील शेतकऱ्यांना दर वर्षी लाखो क्विंटल सोयाबीन बियाण्यांचा पुरवठा केला जातो. यंदा परतीच्या पावसामुळे बीजोत्पादन क्षेत्रात नुकसान झालं होतं त्याचा फटका महाबीजला देखील बसलेला आहे.अपेक्षित सोयाबीन मिळू शकलेले नाही त्यामुळे या हंगामासाठी किती क्विंटल बियाणे महाबीज पुरवेल याबाबत अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकले नाही. याचा अधिक भार खाजगी कंपन्यांच्या बियाणांवर ही राहणार आहे. महाबीजने यंदा दरवाढ टाळल्याने बाजारपेठेत सोयाबीन बियाण्यांच्या दरांवर आपोआपच नियंत्रण येईल अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली आहे. राज्यात मध्यप्रदेशातील बियाणे कंपन्यांकडून पुरवठा केला जातो आहे.

 

Leave a Comment

error: Content is protected !!