कसे कराल तुरीतील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण ? जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो, सध्या तूर पिकाला चांगला भाव मिळतो आहे. खरीप हंगामात तुम्ही देखील तूरिची लागवड केली असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. तूर पिकावर मावा, तुडतुडे, फुलकिडे, कोळी, शेंगावरील ढेकूण शेंगा पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव दिसतो. किडीच्या प्रादुर्भावाची लक्षणे ओळखून नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात.

शेंगा पोखरणारी अळी (हेलिकोव्हर्पा आर्मिजेरा)

तुरीच्या पिकात प्रथम, द्वितीय अवस्थेतील अळीचा फुलांवर व नंतरच्या अवस्थांचा शेंगांवर प्रादुर्भाव आढळून येतो.अर्धी आत व अर्धी बाहेर राहून अळी शेंगातील दाणे खाते. शेंगांवर अनियमित आकाराचे मोठे छिद्र पडते. एक अळी २० ते २५ शेंगांचे नुकसान करते. कळी ते फुलोरा अवस्थेतील पिकाचे आठवड्यातून एकदा एकरी १० ते १२ झाडांचे सर्वेक्षण करावे. पतंगांच्या सर्वेक्षणासाठी एकरी २ कामगंध सापळे लावावेत.

व्यवस्थापन :

पीक कळी ते फुलोरा अवस्थेत असताना फुलगळ दिसून येते. ही फुलगळ नैसर्गिक, पाण्याचा ताण व प्रतिकूल वातावरणामुळे होण्याची शक्यता असते. मात्र, हेलिकोव्हर्वा अळीच्या प्रादुर्भावामुळे देखील फुलगळ होते. ही अळी कळी आणि फुलांना छिद्र पाडून खाते. त्यामुळे अशी गळून पडलेली फुले काळजीपूर्वक पाहिल्यास प्रादुर्भावाचा अंदाज लावता येतो.

पीक फुलोऱ्यावर आल्यापासून कीड मोठ्या प्रमाणात अंडी घालते. अशा वेळी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अझाडिरेक्टीन (३०० पीपीएम) ५ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यामुळे मादी पतंग अंडी घालण्यासाठी कमी प्रमाणात आकर्षित होतात. अळ्यांची खाण्याची क्रिया मंदावते.
हेक्‍टरी २० ते ५० पक्षि थांबे उभारावेत.

जैविक नियंत्रण (प्रमाण ः प्रति १० लिटर पाणी),बॅसिलस थुरिंजेन्सिस (५ डब्लू.पी.) २०.८ ग्रॅम किंवा एचएएनपीव्ही (हेलिकोव्हर्पा अर्मिजेरा न्यूक्लिअस पॉलिहेड्रॉसिस व्हायरस)(२.० ए.एस.) ८.३ मिलि

रासायनिक फवारणी

(फवारणी ः प्रति १० लिटर पाणी)

थायोडीकार्ब (७५ डब्लू.पी.) १६.७ ग्रॅम किंवा

क्विनॉलफॉस (२० टक्के एएफ) ४१.७ मिलि किंवा

क्विनॉलफॉस (२५ ई.सी.) २३.३ मिलि किंवा

डेल्टामेथ्रीन (२.८ ई.सी.) ८.३ मिलि किंवा

इथियॉन (५० ई.सी.) २५ मिलि किंवा

बेनफ्युराकार्ब (४० ई.सी.) ४१.७ मिलि किंवा

इन्डोक्‍झाकार्ब (१४.५ एस.सी.) ६.७ मिलि किंवा

इन्डोक्‍झाकार्ब (१५.८ ई.सी.) ५.६ मिलि किंवा

लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ ई.सी.) ८.३३ मिलि

दुसरी फवारणी ः ( प्रति १० लिटर पाणी)

इमामेक्‍टीन बेन्झोएट (५ एस.जी.) ३.७५ ग्रॅम किंवा

लुफेन्युरॉन (५.४ टक्के ईसी) १० मिलि किंवा

क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (१८.५ एस.सी.) २.५ मिलि किंवा

फ्लूबेनडायमाइड (२० डब्लूजी) ४.२ ग्रॅम किंवा

फ्लूबेनडायमाइड (३९.३५ एस.सी.) १.७ मिलि किंवा

स्पिनोसॅड (४५ एस.सी.) २.७ मिलि किंवा

नोव्हॅल्युरॉन (५.२५ टक्के) अधिक इन्डोक्‍झाकार्ब (४.५ टक्के एस.सी.) संयुक्त कीटकनाशक १४.६ मिलि किंवा

क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (९.३ एस.सी.) अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (४.६ झेडसी) संयुक्त कीटकनाशक ३.३ मिलि

फवारणीचे नियोजन

–पहिली फवारणी पीक ५० टक्के फुलोऱ्यात असताना आणि दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर १५ दिवसांनी करावी.

–तूर पिकामध्ये एक एकर क्षेत्रासाठी नॅपसॅक पंपाने २०० ते ३०० लिटर पाण्याचा वापर शिफारशीत आहे.

–कमी पाण्यात जास्त कीटकनाशकांच्या फवारणीमुळे फुलोऱ्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. त्यासाठी शिफारशीत मात्रेमध्ये कीटकनाशकांचा वापर करावा.

शेंगा पोखरणारी अळी (पिसारी पतंग)

लहान अळी कळ्या, फुलांना छिद्र पाडून खाते. मोठी अळी शेंगावरील साल खरवडून, शेंगांना छिद्र पाडून दाणे खाते.

अळी शेंगेच्या बाहेर राहूनच प्रादुर्भाव करते.

व्यवस्थापन :

हेलिकोव्हर्पा तसेच पिसारी पतंगाच्या अळी या दोन्ही किडींचा प्रादुर्भाव कालावधी सारखाच असतो. त्यामुळे या किडीसाठी वेगळ्या उपाययोजना करण्याची आवश्यकता भासत नाही.

Leave a Comment

error: Content is protected !!