रिपर या भाताच्या कापणी यंत्रासाठी अनुदान कसे मिळवायचे? कुठे अन कसा करायचा अर्ज हे समजून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाकडून विविध योजना राबविण्यात येत असतात. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानासोबत इतर शेतीविषयक माहिती देणे तसेच विविध प्रयोगात्मक कार्यक्रम राबविणे यासाठी प्रोत्साहित करणे या उद्देशाने या योजना राबविण्यात येतात. ज्यात काही आर्थिक तरतुदी ही करण्यात आलेल्या असतात. शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (भात)/ कृषी यांत्रिकीकरण ऊप-अभियान अंतर्गत रिपर या भाताच्या कापणी यंत्रासाठी अनुदान म्हणून अनुसूचित जाती, जमाती, महिला, अत्यल्प व अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी ५०% किंवा ६३००० रु तर सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी ४०% किंवा ५०,००० रु यापैकी कमी असेल ती रक्कम अनुज्ञेय असते. सक्षम शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, वैयक्तिक शेतकरी या योजनेचा लाभ घेवू शकतात.

लाभ घेण्यासाठीचे निकष
१. कार्यक्रम आत्मा अंतर्गत नोंदणीकृत गटांना प्राधान्य
२. गावाची आरोग्य पत्रिका असावी
३. कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद यांचा सहभाग महत्वाचा
४. ३०% महिलांना प्राधान्य
५. शेतकरी मासिक वर्गणीधारक होणे बंधनकारक असेल ई.

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे
१. ७/१२
२. ८-अ
३. प्रकल्प अहवाल
४. मागणी पत्र ई.

तालुका कृषी अधिकारी, उप-विभागीय कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, ई. ठिकाणी अधिक माहितीसाठी संपर्क साधता येतो.

Leave a Comment

error: Content is protected !!