दूध उत्पादन वाढीसाठी कसा असावा दर्जेदार पशुआहार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: जनावरांना दिला जाणारा आहार दुधाच्या गुणवत्तेवर परिणाम करत असतो. जनावरांच्या गरजेनुसार आहाराचे योग्य नियोजन केल्यास दुधाची प्रत सुधारण्यास मदत होते. जनावरांच्या आहारातील चारा आणि पशुखाद्यच्या प्रमाणावर दुधाची प्रत अवलंबून असते. चारा कुट्टीचा योग्य आकार महत्त्वाचा आहे. जो दुधाची प्रत ठरण्यास कारणीभूत असतो आहारामध्ये स्टार्सचे प्रमाण हा महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे दुधाची प्रत ठरवता येते. आहारमधून मधून दिल्या जाणाऱ्या पदार्थावर दुधाची प्रत अवलंबून असते. पशु आहारातील स्निग्धांश आणि प्रथिने यांची मात्रा दुधाची प्रत वाढवण्यास मदत करते.
चारा आणि पशुखाद्य चे प्रमाण (40 :60) कमीत कमी असणे हे दुधाचा स्निग्धांश वाढवण्यास गरजेचे असते. हे प्रमाण ठेवल्यामुळे ओटीपोटातील आम्लता कमी होते प्रोपियनिक आम्लं निर्मिती वाढते जे दुधाचा स्निग्धांश वाढवायला मदत करते.

धान्य युक्त आहार

योग्य पशुखाद्य घालताना चारा आणि पशुखाद्यचे प्रमाण आणि तंतुमय पदार्थ विरहीत कार्बोदकाचे प्रमाण महत्त्वाचं ठरतं. तंतुमय पदार्थ विरहित कार्बोदके यांचे प्रमाण एकूण शुष्क पदार्थाच्या आहारावर 36 ते 38 टक्के असावे. योग्य प्रमाणात तंतुमय पदार्थ विरहित कार्बोदके खाऊ घातल्यास दुधाचा स्निग्धांश आणि प्रथिने वाढण्यास मदत होते. परंतु अति प्रमाणात खाऊ घातल्यास दुधाचा स्निग्धांश एक युनिट कमी होतो परंतु प्रथिने 0.2 ते 0.3 युनिटने वाढतात.

धान्य प्रक्रिया

धान्याचे प्रकार आणि त्यावर करावयाची प्रक्रिया याचा महत्त्वाचा परिणाम आहारामधील स्टार्च, पचनीयता , दूध वाढ तसेच दुधाची प्रत वाढवण्यास मदत होते दळलेले, रोल केलेले, गरम केलेले, स्टीम फ्लेवर्ड, वाफवलेले किंवा गोळी पेंड स्वरूपात धान्य खाऊ घातल्यास त्यामधून स्टार्सची पचनियता आणि प्रोपियनिक आमल निर्मिती वाढते. जे दुधाचा स्निग्धांश वाढवायला मदत करतात. स्टीम फ्लेक्स मका किंवा ज्वारी तुलनेनं वाफवलेला मका किंवा ज्वारी पेक्षा सातत्यपूर्ण दूध निर्मिती आणि दुधाचे प्रथिन वाढ होते परंतु दुधाच्या स्निग्धांश यांमध्ये बदल होत नाही. काही धान्य जसे की गहूं मध्ये कार्बोदके असतात याचा आणि त्याच्यावरील अति प्रमाणातील प्रक्रिया विस्तृत प्रमाणात वापराचा परिणाम दुधाच्या स्निग्धांश आणि दूध निर्मिती कमी होण्यावर होतो. कार्बोदके आणि प्रथिनांचे माध्यम तसेच तंतुमय पदार्थ कर्बोदकांचे आहारातील प्रमाण यांचे निरीक्षण करावे जेणेकरून योग्य किणवन पद्धतीची खात्री होते. त्यामुळे दुधाची प्रत वाढण्यास मदत होते

दूध उत्पादन वाढवण्यासाठी

– व्यवस्थित भाकड काळ ठरवावा
– वेता च्या पहिल्या आठवड्यात दुधाचा ताप ( रक्तातील कॅल्शिअम कमी होणे )येणार नाही याची काळजी घ्यावी.
– व्यायल्यानंतर गाईची निगा राखावी.
– ओटीपोटातील आरोग्य आणि आम्लता प्रतिबंधित करावी.
– चयापचयाचे आजार ओळखून त्यावर तातडीने उपाययोजना करावी.
– वेताच्या वेळी शरीर स्थिती गुण बीसीएस 3.0 ते 3.25 यादरम्यान ठेवावा.

Leave a Comment

error: Content is protected !!