पावसाळ्यात कसे कराल फळबागेचे व्यवस्थापन ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मात्र अशावेळी फळबागांची विशेष काळजी घ्यावी लागते पावसाळ्यात फळबागांची कोणती काळजी घ्यावी ? याची माहिती आजच्या लेखात पाहूया

१)जास्त पाऊस झालेल्या ठिकाणी संत्रा/मोसंबी बागेत झाडाच्या खोडाजवळ पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी.

२)बागेतील अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

३)जास्त पाऊस झालेल्या ठिकाणी डाळींब बागेत झाडाच्या खोडाजवळ पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी.

४) जास्त पाऊस झालेल्या ठिकाणी चिकू बागेत झाडाच्या खोडाजवळ पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. बागेतील अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

सध्य हवामान स्थितीत काय करावे ?

भाजीपाला

गादीवाफ्यावर तयार केलेल्या भाजीपाला पिकांच्या रोपांना 45 दिवस झाले असल्यास पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून भाजीपाला पिकांची (वांगी, मिरची, टोमॅटो इ.) पूर्नलागवड करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

पाउस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा असल्याची खात्री करून फुल पिकाची पूर्नलागवड करावी. काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी.

चारा पिके

पेरणी न झालेल्या ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस (75 ते 100 मिमी) झाल्यानंतर वापसा येताच बिजप्रक्रिया करून चारा पिकांची पेरणी करावी.

तुती रेशीम उद्योग

ढगाळ वातावरणात रेशीम कीटक संगोपनाची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. बाह्य रेशीम कीटक संगोपनगृहात 25 अं.से. तापमान व 65 टक्के सापेक्ष आर्द्रता कात अवस्थेत असणे आवश्यक असते. कातेवर बसताना 5 ग्रॅम प्रति चौ. फुट याप्रमाणे पांढरा कळीचा चूना अळयांवर धुरळणी करावी. 24 तास कात अवस्थेत तुतीपाने खाद्य देऊ नये. त्यामूळे कात ओळखता येणे महत्वाचे आहे. काते वरून उठताना खाद्य देण्याअगोदर अर्धातास निर्जंतूक विजेता किंवा अंकुश पावडर अळ्यांवर सचिद्र पातळ सुती कपडयाने धुरळणी करावी. 100 अंडीपूजास 15 कि.ग्रॅ. चुना व 4.5 कि.ग्रॅ. विजेता पावडर लागते.

Leave a Comment

error: Content is protected !!