सद्य हवामान स्थितीत कसे कराल पिक आणि फळबागांचे व्यवस्थापन ? वाचा तज्ञांचा सल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सद्य हवामान स्थितीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक राहून तूरळक ठिकाणी मूसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर सोयाबीन, खरीप ज्वारी, बाजरी, ऊस, हळद पिकात साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक राहून तूरळक ठिकाणी मूसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर संत्रा/मोसंबी, डाळींब, चिकू बागेत साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी. बागेत फवारणीची कामे पुढे ढकलावीत. नविन लागवड केलेल्या संत्रा/मोसंबी, डाळींब, चिकू झाडांना काठीचा आधार द्यावा.

भाजीपाला

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक राहून तूरळक ठिकाणी मूसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर भाजीपाला पिकात साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. नविन लागवड केलेल्या भाजीपाला पिकांना काठीचा आधार द्यावा.

फुलशेती

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक राहून तूरळक ठिकाणी मूसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर फुल पिकात साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत. काढणीस तयार असलेल्या फुल पिकांची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. नविन लागवड केलेल्या फुल पिकांना काठीचा आधार द्यावा.

तुती रेशीम उद्योग

यशस्वी कोष उत्पादन घेण्यासाठी तुती लागवडीनंतर दर दिड महिण्यात तुती छाटणी करावी. लागवडीच्या दूसऱ्या वर्षापासुन पुढे 15 ते 20 वर्षा पर्यंत मिळू शकते. पण तुतीच्या वाढीसाठी आवश्यक अन्नघटक नत्र, स्फुरद, पालाश या रासायनीक खताची मात्रा 140 कि.ग्रॅ. अमोनियम सल्फेट 170 कि.ग्रॅ. सिंगल सुपर फॉस्फेट आणि 19 कि.ग्रॅ. म्यूरेट पोटॅश प्रति एकर प्रति कोषाचे पीक याप्रमाणे देणे. जुन व नोव्हेंबर महिण्यात 4 क्विंटल प्रमाणे एकूण 8 क्विंटल कुजलेले शेणखत टाकणे आवश्यक आहे. इतर जैविक खते व हिरवीचे खते टाकणे त्याचबरोबर जून व जानेवारी महिण्यात पट्टा पध्दत लागवडीत बरू किंवा ढेंचा हे द्विदल पीके पेरणी करून फुलोरा येण्याच्या वेळी (दिड महिण्या नंतर) जमीनीत गांडूळ टाकणे.

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे,
मुख्य प्रकल्प समन्वयक,
ग्रामीण कृषी मौसम सेवा,
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

Leave a Comment

error: Content is protected !!