जनावरांमधील कासदाह आजारावर अशा पद्धतीने घरीच करा उपचार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पशुपालकांनो अनेकदा दुधाळ जनावरांना कासेचे आजार होतात. त्यापैकीच कासदाह हा एक आजार आहे. जनावरांचे सड किंवा कास खराब झाल्यास जनावरांची उत्पादकता कमी होते. परिणामी अशा जनावरांचे बाजारमुल्यही कमी होते. त्यासाठी आजाराची लक्षणे ओळखून त्वरित उपचार करणे गरजेचे असते. गुजरात येथील नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाने कासदाह आजारावर नैसर्गीक उपचारांची शिफारस केली आहे. ही औषधे घरात सहज उपलब्ध होणारे जीन्नस वापरुन कमी खर्चात तयार करता येतात.

हा आजार होण्याची कारणे

–मोठी कास असणाऱ्या तसेच संकरित जनावरांमध्ये कास दाह होण्याचे प्रमाण जास्त असते.
–वाढत्या वयाची जनावरे म्हणजे तिसऱ्या- चौथ्या वेतातील जनावरांमध्येही कासदाहाचे प्रमाण जास्त असते.
–जनावरे बसण्याची आणि सभोवतालच्या जागेची अस्वच्छता.
–धार काढणाऱ्या व्यक्तीची अस्वच्छता.
–दूध पूर्ण न काढले गेल्यामुळे. कासेला जखम झालेली असणे इ.

औषध कसे तयार करायचे?

कोरफड, हळद, चुना आणि लिंबू वापरुन हे औषध तयार होते. यामध्ये २५० ग्रॅम कोरफड, ५० ग्रॅम हळद, १५ ग्रॅम चुना एकत्र मिक्सरमध्ये वाटून पेस्ट तयार करावी.

वापरण्याची पद्धत

–मुठभर पेस्टमध्ये १५० ते २०० मिली पाणी घालून पातळ मिश्रण तयार करावे.

–जनावराची कास स्वच्छ धुऊन तयार केलेले मिश्रण पूर्ण सडावर लावावे. हे मिश्रण दिवसातून १० वेळा सलग पाच दिवस लावावे.

–२ लिंबाचे काप दिवसातून दोन वेळा सलग तीन दिवस चारावे.

–दुधामध्ये रक्त किंवा लालसरपणा असेल तर वरील मिश्रणामध्ये दोन मुठी कडीपत्ता व गुळ याची पेस्ट दिवसातून दोनवेळा चारावी.

 

Leave a Comment

error: Content is protected !!