सद्य हवामान परिस्थितीत कसे कराल पीक व्यवस्थापन ? जाणून घ्या कृषी तज्ञांचा सल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाडयात दिनांक 29 जुलै ते 04 ऑगस्ट दरम्यान पाऊस सरासरी एवढा राहण्याची शक्यता आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्यवस्थापन

१) कापूस : पाऊस झालेल्या भागातील कापूस पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. कापूस पिकात मर किंवा मूळकुज दिसून येत असल्यास जमिनीत वापसा आल्यानंतर कॉपर ऑक्सीक्लोराईड 25 ग्रॅम + युरीया 200 ग्रॅम + पांढरा पोटॅश 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणात घेऊन हे द्रावण झाडाच्या मूळाजवळ प्रति झाड 100 मिली द्यावे.

कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या (मावा, तूडतूडे) किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्क किंवा र्व्हीटीसीलीयम लिकॅनी 40 ग्रॅम किंवा ॲसिटामाप्रिड 20% 60 ग्रॅम किंवा डायमिथोएट 30% 260 मिली प्रति एकर पावसाची उघाड बघून व जमिनीत वापसा आल्यानंतर फवारणी करावी.

कापूस पिकामध्ये शंखी गोगलगायीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यात बूडवून माराव्यात. गोगलगायींच्या नियंत्रणासाठी कापूस पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड दोन किलो प्रति एकर याप्रमाणात शेतात पसरून द्यावे.

२) तुर : पाऊस झालेल्या भागातील तुर पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते काढण्याची व्यवस्था करावी. तसेच जिथे मर रोगाची सुरूवात होत असल्यास जमिनीत वापसा आल्यानंतर कॉपर ऑक्सीक्लोराईड 25 ग्रॅम + युरीया 200 ग्रॅम + पांढरा पोटॅश 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणात घेऊन हे द्रावण झाडाच्या मूळाजवळ प्रति झाड 100 मिली द्यावे.

३) मूग/उडीद : पाऊस झालेल्या भागातील मूग/उडीद पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. मुग/उडीद पिकात मावा किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 13 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून व जमिनीत वापसा आल्यानंतर फवारणी करावी.

मूग/उडीद पिकामध्ये शंखी गोगलगायीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यात बूडवून माराव्यात. गोगलगायींच्या नियंत्रणासाठी मूग/उडीद पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड दोन किलो प्रति एकर याप्रमाणात शेतात पसरून द्यावे.

४) भुईमूग : पाऊस झालेल्या भागातील भुईमूग पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. भुईमूग पिकामध्ये शंखी गोगलगायीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यात बूडवून माराव्यात. गोगलगायींच्या नियंत्रणासाठी भुईमूग पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड दोन किलो प्रति एकर याप्रमाणात शेतात पसरून द्यावे.

५) मका : पाऊस झालेल्या भागातील मका पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायामिथोक्झाम 12.6 टक्के + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 5 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघून व जमिनीत वापसा आल्यानंतर फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.

Leave a Comment

error: Content is protected !!