माणुसकी …! नुकसानग्रस्त ऊसतोड मजुरांच्या मदतीला कारखाना धावला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : अवकाळी पावसाच्या तडाख्याने पश्चिम महाराष्ट्रात ऊसतोड मजुरांची मोठी दैना झाली आहे. सलग तीन दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने ऊसतोड मजुरांच्या खोपटात पाणी शिरले असून, संसारोपयोगी साहित्यासह अन्नधान्याचेही नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. अशा अडचणीच्या काळात कृष्णा कारखाना नुकसानग्रस्त ऊसतोड मजुरांच्या मदतीला धावला आहे. कारखान्यामार्फत जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप कृष्णा बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते ऊसतोड मजुरांना करण्यात आले.

अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांसह ऊस तोडणी कामगारांनाही मोठा फटका बसला आहे. निसर्गाच्या तडाख्याने शेतकरी व ऊसतोड मजूर कोंडीत सापडला आहे. गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे तोडणी मजुरांचे हाल होत आहेत. पावसामुळे संपूर्ण धान्य व संसार उपयोगी साहित्य पाण्यात भिजुन गेले आहे. त्यामुळे ऊसमजूर चिंताग्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने ऊसतोड मजुरांसाठी जीवनावश्यक वस्तू वाटपाचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ५००० जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात येत आहे.

त्याचबरोबर ऊसतोड मजुरांच्या जनावरांना गोळी पेंड देण्यात येत आहे. कारखान्याच्या संचालकांकडूनही त्यांच्या भागातील ऊसतोड मजुरांना भोजनाची तसेच मजुरांच्या निवाऱ्याची सोय करण्यात येत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!